CoronaVirus : चीनवर पुन्हा कोरोनाचे संकट, एका दिवसात ६३ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 03:24 PM2020-04-09T15:24:03+5:302020-04-09T15:52:47+5:30

कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरात १५ लाखांहून अधिका लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८८ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचे ६३ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन स्थानिक आहेत, तर ६१ बाहेरच्या देशांतून चीनमध्ये आलेल्या नागरिकांचा समावेश आहे.

नवे रुग्ण आढळल्यामुळे चीनवर पुन्हा कोरोनाचे संकट ओढावले आहे.

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले की, चीनमध्ये बुधवारी दोन महिन्यापेक्षा जास्त काळानंतर लॉकडाऊन हटविण्यात आले. मात्र, नव्या कोरोना रुग्णांमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशात कोरोनामुळे एकूण ३३३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांचा आकडा ८१८६५ इतका आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

दरम्यान, चीनमध्ये काही दिवसांपासून कोरोनाचे नवे रुग्ण आढळत नव्हते. सलग तीन दिवसापर्यंत एकही स्थानिक रुग्ण आढळला नाही.

मात्र, आता एका दिवसात नवीन ६३ रुग्ण आढल्यानंतर पुन्हा कोरोना बाधितांचा आकडा ११०४ वर पोहोचला आहे. त्यामुळे चीनवर पुन्हा कोरोनाचे संकट ओढवले आहे.