शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: जर ‘असं’ झालं तर कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखणं कोणालाच शक्य होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 11:05 AM

1 / 13
जगभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. देशातही याची संख्या 148 झाली आहे. लोकांना याचा प्रसार होऊ नये म्हणून विविध सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. लोकांना स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि गर्दी असलेल्या ठिकाणांपासून दूर रहाण्यास सांगितले जात आहे.
2 / 13
कोरोना व्हायरसचा वाढत्या प्रादुर्भावाबद्दल जगभरात अनेक अभ्यास करण्यात येत आहेत. हा व्हायरस कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येऊन पसरतो. म्हणून, ताप, खोकला, श्वास घेण्यात त्रास यासारखे लक्षणे दिसणाऱ्या लोकांपासून दूर राहण्याचे आवाहन केलं जात आहे.
3 / 13
एकप्रकारे हे सहज ओळखता येत आहे त्यामुळे या आजाराची लक्षण दिसणाऱ्या व्यक्तीला स्वत:पासून दूर ठेवता येतं त्यामुळे व्हायरसचा प्रसार रोखण्यात मदत होते.
4 / 13
परंतु चिंता करण्याचं कारण म्हणजे कोरोना व्हायरसमुळे पीडित असूनही, बऱ्याच लोकांमध्ये याची लक्षणं दिसत नाही. अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्समध्ये अशीच अनेक उदाहरणं समोर आली आहेत.
5 / 13
मॅसेच्युसेट्समध्ये 82 रुग्ण आढळले आहेत की त्यांच्यामध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही चिन्हे नसतानाही लोक साथीच्या आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आलं आहे. त्याच वेळी, बर्‍याच अभ्यासात असं दिसून आलं आहे की हेच लोक जास्त संक्रमण पसरव आहेत.
6 / 13
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, 'काही अहवालानुसार नवीन कोरोना व्हायरसची लक्षणे दिसण्यापूर्वीच त्याचा प्रसार होण्यास सुरवात होते. मात्र व्हायरसचा प्रसार होण्याचं हे मुख्य कारण नाही.
7 / 13
पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसचे अधिकारी डॉ. दिब्रोह म्हणाले, आम्ही २० वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांचा अभ्यास करतोय ज्यांच्यामध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.
8 / 13
दिब्रोह यांना विचारले गेले की केवळ लक्षणं दिसत नसलेले लोक व्हायरसचा प्रसार करण्यासाठी जबाबदार आहेत काय? त्याला उत्तर म्हणून दिब्रोह म्हणाले, तुम्हाला माहिती नाही की किती लोक हे विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात आणि लोक हा धोकादायक रोग गंभीरपणे घेतात.
9 / 13
काही लोकांमध्ये या रोगाची लक्षण दिसून येत नाही मात्र आजार त्यांच्या शरीरात असतो. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे.
10 / 13
CNN ला मुलाखत देताना अनेक तज्ज्ञांनी सांगितले की, सध्या हा आजार पसरवणाऱ्यांमध्ये लक्षणं दिसणारे किती आणि नसणारे किती याची आकडेवारी स्पष्ट नाही.
11 / 13
मात्र लक्षणे दिसून न येणारे लोकांमुळे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणं कठीण जात आहे असं सांगण्यात येतं.
12 / 13
सीडीसीचे डायरेक्टर माइकल ओस्टरहोम यांनी सांगितले की, या व्हायरसचा प्रसार करण्यामध्ये लक्षण न दिसाणाऱ्यांची महत्त्वाची भूमिका आहे हे स्पष्ट झालं आहे.
13 / 13
तसेच लक्षण न दिसणाऱ्या व्यक्तीकडून कोरोना व्हायरस वाढू शकतो त्यामुळे त्याला नियंत्रित ठेवणं कठीण होईल असं ओस्टरहोम यांनी सांगितले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या