शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: पुढील वर्षी येईल कोरोनावरील लस, प्रत्येक कंपनीच्या लसीची एवढी असेल किंमत

By बाळकृष्ण परब | Published: November 18, 2020 1:50 PM

1 / 7
देशातील कोरोना विषाणूचा फैलाव थांबेल असे वाटत असतानाच दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढत आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून लोक वाट पाहत असलेल्या कोरोनाच्या लसीबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुढील वर्षापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोनावरील या लसीची किंमत किती असेल याबाबत अंदाज वर्तवण्यात येऊ लागले आहेत.
2 / 7
अमेरिका, जर्मनी, ब्रिटनसह जगभरातील अन्य देशातील कंपन्यासुद्धा आता कोरोनावरील लसीच्या संभाव्य किमतीचा विचार करत आहेत. अमेकिरेमध्ये कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी ९५५ दशलक्ष डॉलर खर्च करण्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला ३२ ते ३७ डॉलर म्हणजेच सुमारे २८०० रुपयांना लसीचा एक डोस मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
3 / 7
कोरोनावरील लस विकसित करण्यात जवळपास यशस्वी ठरलेल्या फायझर कंपनीने सांगितले की, त्यांना आपली लस विकसित करण्यासाठी कुठलाही केंद्रीय निधी मिळाला नाही. मात्र या कंपनीची जर्मन सहकारी कंपनी असलेल्या बायोएनटेकला ३७५ मिलीयन युरो (४४४ मिलियन डॉलर) एवढी रक्कम मिळाली. फायझरने आपल्या लसीची किंमत ३ हजार रुपये निश्चित केली आहे. अमेरिकन कंपनी मॉडर्नाच्या तुलनेत ही लस अधिक महाग असण्याची शक्यता आहे.
4 / 7
फायझर कंपनीने अमेरिकेसोबत सुमार २ दशलक्ष डॉलरच्या पुरवठ्याचा करार केला आहे. अमेरिकेने मॉडर्नाच्या लसीच्या खरेदीसाठी १.५३ बिलियन डॉलरपर्यंत रक्कम मोजण्याची तयारी दर्शवली आहे.
5 / 7
रशियाची स्पुटनिक व्ही ही लस कंपनीने लसीच्या किमतीबाबत अद्याप कुठलेली संकेत दिलेले नाहीत. आतापर्यंत लसीची किंमत निश्चित झाली नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
6 / 7
दुसरीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस कोविशिल्ड ही अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना ३ डॉलर म्हणजे केवळ २२५ रुपयांत उपलब्ध करून देण्याचा दावा करण्यात येत आहे. तर भारतामध्ये आयसीएमआरच्या मदतीने सीरम इंस्टिट्युटनेसुद्धा कोव्हॅक्सिनच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही लस १ हजार रुपयांहून कमी किमतीत सर्वसामान्यांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते.
7 / 7
तसेच नोव्हामेक्स लसीचे भारतातील उत्पादन हे सीरम इंस्टिट्युटला करावे लागणार आहे. अशा स्थितीत २४० रुपये प्रति डोस किंमत असलेल्या या लसीचे १०० दशलक्ष डोस उत्पादित केले जातील. दरम्यान या लसींच्या संग्रहाची पद्धत वेगवेगळी राहणार आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत