CoronaVirus : Covid-19 वॅक्सीनबाबतच्या 'त्या' बातमीला बिल गेट्स यांनी सांगितले फेक न्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 01:33 PM2020-07-24T13:33:57+5:302020-07-24T13:56:07+5:30

गेट्स म्हणाले की, हा खोटा आरोप आहे. मी माझ्याकडून कोरोना व्हायरसला नष्ट करण्याचे शक्य ते प्रयत्न करत आहे.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांच्याबाबत कोरोना व्हायरस वॅक्सीनसंबंधी एक अफवा पसरवली जात आहे.

ही अफवा आहे की, बिल गेट्स यांना कोरोना व्हायरस वॅक्सीनच्या माध्यमातून लोकांच्या शरीरात एक मायक्रोचिप टाकायची आहे. जेणेकरून लोकांच्या स्थितीची माहिती मिळावी. मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं बिल गेट्स यांनी स्पष्ट केलंय.

बिल गेट्स यांनी सीबीएस न्यूजला सांगितले की, ही फेक न्यूज दूर करावी. लोकांना खरं काय ते कळावं. मे महिन्यात रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुख्य जेनाडी यूगेनोव यांनी एका लेख लिहिला होता.

या लेखातून बिल गेट्स यांच्यावर आरोप लावला होता की, बिल गेट्स यांना वॅक्सीनच्या माध्यमातून लोकांच्या शरीरात मायक्रो चिप लावायची आहे. जेणेकरून त्यांची सगळी माहिती मिळावी.

गेट्स म्हणाले की, हा खोटा आरोप आहे. मी माझ्याकडून कोरोना व्हायरसला नष्ट करण्याचे शक्य ते प्रयत्न करत आहे. अनेक कंपन्यांना वॅक्सीन तयार करण्यासाठी आणि रिसर्चसाठी फडींग केलं आहे.

बिल गेट्स यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक औषधी कंपन्यांना वॅक्सीनच्या रिसर्चसाठी १०० मिलिनय यूएस डॉलर्सची मदत केली आहे.

यादरम्यान बिल गेट्स यांच्या मदतीने GSK आणि क्योरवॅक नावाच्या दोन कंपन्यांना mRNAआधारित वॅक्सीन तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. यावेळी दोन्ही कंपन्या पाच वॅक्सीन mRNA आणि मोनोक्लोनल अॅंटीबॉडीज आधारावर तयार करत आहेत.

तर दुसरीकडे मॉडर्ना, BioNTech आणि फायजर सुद्धा आपली कोविड-१९ वॅक्सीन द एप्रोच नावाने प्रायोगिक पद्धतीवर तयार करत आहे.

अशातच गुगलने सांगितले की, ते कोणत्याही औषध कंपनीला किंवा कुणालाही कोरोना व्हायरस महामारीच्या विरोधात प्रचार करू देणार नाही. कोणत्याही अशा गोष्टीचा प्रचार करणार नाही जे वैज्ञानिक विचाराच्या विरोधात असेल.

गुगलकडून सांगण्यात आले आहे की, असा कोणताच कंटेंट ते पैशांसाठी टाकणार नाही जो कॉन्सपिरेसी थेअरीशी जळलेला असेल. कोणत्याही व्यक्तीकडून, देशाकडून, संस्थेकडून अशी कोणतीही न्यूज गुगलवर जाणार नाही जी कॉन्सपिरेसी थेअरीवर आधारित असेल.