शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यावर 16 वर्षीय मुलाला हार्ट अटॅक; सरकार देणार 1.5 कोटी, 'या' देशात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 11:30 AM

1 / 17
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 210,132,639 वर पोहोचली आहे. तर 4,405,913 जणांचा मृत्यू झाला आहे.
2 / 17
कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून डेल्टा व्हेरिएंटचा कहर दिसून येत आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे.
3 / 17
कोरोना लसीचे अनेक साईडइफेक्ट पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका 16 वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला आहे.
4 / 17
सिंगापूरमध्ये हा भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सरकारने त्याला मोठी नुकसानभरपाई दिली आहे. लस घेतल्यानंतर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 / 17
सिंगापूर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलाने फायझर (Pfizer vaccine) लसीचा डोस घेतला होता. हा डोस घेतल्यानंतर सहा दिवसांमध्येच त्याला हृदयविकाराचा झटका आला.
6 / 17
लस घेतल्यानंतर हा धक्का बसल्यामुळे मुलाने सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली. सरकारने परिस्थितीची माहिती करुन घेत, त्याला 2 लाख 25 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास दीड कोटी देण्याची घोषणा केली.
7 / 17
सिंगापूर व्हॅक्सिन इंज्युरी फायनॅन्शिअल असिस्टंट प्रोग्राम (VIFAP) या योजनेअंतर्गत त्याला ही रक्कम मिळणार आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये असं दिसून आलं, की मायोकार्डिटिसच्या (Myocarditis) समस्येमुळे या मुलाला हृदयविकाराचा झटका आला होता.
8 / 17
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यामुळेच ही समस्या उद्भवल्याची शक्यता मेडिकल रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. यासोबतच कॅफेनचे (Caffeine) अतिसेवन, आणि अवजड वस्तू उचलल्यामुळेही हृदयावर ताण आला असेल, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
9 / 17
मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची तब्येत सुधारत असल्याचे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मायोकार्डिटिस या आजारामध्ये हृदय कमकुवत होतं. यात हार्ट अटॅक येऊन मृत्यूही होऊ शकतो.
10 / 17
साधारणपणे एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळे हा आजार होतो. छातीमध्ये दुखणे, श्वास भरुन येणे ही याची लक्षणे आहेत. हेल्थ सायन्स अथोरिटीने म्हटले आहे, की लसीकरणानंतर मायोकार्डिटिस किंवा पेरिकार्डिटिस होण्याची शक्यता असते.
11 / 17
सिंगापूरमध्ये मात्र एक लाखांमध्ये केवळ 0.48 लोकांना ही समस्या दिसून येत आहे. फार्माकोविजिलेन्स मॉनिटरिंगच्या आधारे प्राप्त झालेल्या डेटानुसार ही माहिती देण्यात आली आहे. हे टाळण्यासाठी लसीकरण झाल्यानंतर कमीत कमी एक आठवडा आराम केला पाहिजे.
12 / 17
जिम, किंवा कोणतीही स्पोर्ट्स एक्टिव्हिटी करणं टाळावं असं आवाहन अथॉरिटीने केलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
13 / 17
भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अमेरिका, ब्रिटनमध्ये ही भीती काही प्रमाणात खरी होताना पाहायला मिळत आहे.
14 / 17
लहान मुलांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही आधीच्या तुलनेत वाढली असल्याचं समोर आलं आहे. भारतासाठी हा धोक्याचा इशारा असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेतील अल्बामा, अरकंसास, लुसियाना आणि फ्लोरिडामध्ये 18 वर्षाखालील मुलांमधील संसर्गाचे प्रमाण वाढले आहे.
15 / 17
अरकंसासमधील लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 50 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सात नवजात बालके अतिदक्षता विभागात असून दोन व्हेंटिलेटवर असल्याची माहिती मिळत आहे.
16 / 17
फ्लोरिडातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षाखालील 10 हजार 785 मुलांना कोरोनाची लागण झाली. तर 23 जुलै ते 30 जुलै दरम्यान 224 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
17 / 17
युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टलचे बाल रोग तज्ज्ञ प्रा. एडम फिन्न यांनी लहान मुलांमध्ये कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. कोरोनाबाधित मुलांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हा आजार पहिल्या दोन लाटेच्या तुलनेने वेगळा असल्याचं म्हटलं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसsingaporeसिंगापूरHeart Attackहृदयविकाराचा झटका