शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचं संकट; तब्बल 50 लाख लोकांची चाचणी अन् लॉकडाऊनची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 3:11 PM

1 / 10
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2 / 10
कोरोनाने जगभरात थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 43,824,996 वर पोहोचली आहे.
3 / 10
जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1,165,289 लोकांना आपला जीव गमवाव लागला आहे. तर आतापर्यंत 32,206,606 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
4 / 10
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.
5 / 10
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील एका मोठ्या शहरामध्ये तब्बल 50 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.
6 / 10
पुन्हा एकदा या संपूर्ण भागामध्ये लॉकडाऊन लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांगजवळील काशगरमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहे.
7 / 10
कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कोरोना चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून 137 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
8 / 10
झिंजियांगमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. रविवारी दुपारपर्यंत चीनच्या या भागातील 28 लाखांहून अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
9 / 10
मंगळवारपर्यंत या भागातील 47 लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील अशी अपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांना आहे. मार्च महिन्यामध्येच चीनला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आलं.
10 / 10
कोरोनाला रोखल्यानंतर आता पुन्हा शिनजियांगजवळच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. म्हणूनच नागरिकांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या