अभिनंदन! ६५ व्या वर्षी हरीश साळवे दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, लग्नसोहळा लंडनमधील चर्चमध्ये संपन्न
By पूनम अपराज | Updated: October 29, 2020 19:03 IST
1 / 11मराठमोळे ६५ वर्षीय ज्येष्ठ वकील हरिश साळवे लंडनमधील आर्टिस्ट कॅरोलिन ब्रॉसार्डसोबत दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत.2 / 11हरिश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली होती.3 / 11बुधवारी लंडनमधील चर्चमध्ये १५ पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न समारंभ पार पडला. या समारंभास काही ठराविक नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते4 / 11३८ वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर साळवे विभक्त झाले होते. त्यांना दोन मुली आहेत.5 / 11तर कॅरोलिन ब्रॉसार्ड यांचंही हे दुसरं लग्न असून तिला १८ वर्षांची एक मुलगी आहे.6 / 11हरीश साळवे यांना घरातूनच वकिलीचे बाळकडू मिळालं असं म्हणावं लागेल. कारण त्यांचे आजोबा पी. के. साळवे. ते प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. याशिवाय त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. हरीश साळवेंचे वडील वडील हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.7 / 11 हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. १९९२ मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि १९९९ मध्ये त्यांना सॉलिसिटर जनरल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 8 / 11 वकिली करण्याआधी ते सीए झाले. मात्र, नंतर त्यावेळचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची पदवी मिळवली. वकील झाल्यापासून साळवेंनी अनेक मोठे खटले लढले आहेत. 9 / 11 यात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकारव वाद अशा अनेक मोठ्या खटल्यांचा अनुभव साळवेंकडे आहे. हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये ४३ व्या क्रमांकावर आहे. यात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकारव वाद अशा अनेक मोठ्या खटल्यांचा अनुभव साळवेंकडे आहे.10 / 11 हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये ४३ व्या क्रमांकावर आहे.11 / 11संपूर्ण दिवसासाठी त्यांची फी २५ ते ३०लाख रुपयांपर्यंत सांगितली जाते. दिल्लीतील भगवान दास रोडवरील व्हाईट हाऊसमध्ये हरिश साळवे यांचं कार्यालय आहे. तर ते ज्या घरात राहतात त्याची किंमत कोट्यवधी रुपये सांगितली जाते.