बापरे...! चीनच्या मानवरहीत पाणबुडीने जे केले, ते पाहून जगाचे डोळे विस्फारले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 10:55 AM2020-06-12T10:55:02+5:302020-06-12T11:14:09+5:30

चीनच्या मानवरहीत पाणबुडीने हा कारनामा केला आहे. यामुळे अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अमेरिकेलाही हे जमलेले नाही.

अख्ख्य़ा जगाला कोरोनाच्या महासंकटात लोटून चीन जगाला ताकद दाखवत आहे. मोठ्या अवधीचा युद्धसराव करत असताना चीनने जगाला आश्चर्यचकीत आणि तेवढेच धमकावणारे रेकॉर्ड केले आहे.

चीनच्या मानवरहीत पाणबुडीने हा कारनामा केला आहे. यामुळे अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अमेरिकेलाही हे जमलेले नाही.

चीनच्या या मानवरहीत पाणबुडीने पृथ्वीच्या सर्वांत खोल बिंदूपर्यंत गोता लगावला आहे. यावेळी या पाणबुडीने सर्वात खोल समुद्रातील नमुने एकत्र केले आहेत. तसेच भूगर्भातील उच्च गुणवत्तेचे फोटो घेतले आहेत.

मंगळवारी याबाबतची माहिती समोर आली आहे. यामध्ये चीनच्या सबमर्सिबल पाणबुडीने समुद्रातील नमुने गोळा केले आहेत. सबमर्सिबल ही खोलवर पाण्यामध्ये जाऊ शकते. या पाणबुडीचा वापर संशोधनासाठीही केल जातो.

चीनच्या या पाणबुडीचे नाव 'हायदू-1' असे आहे. ती प्रशांत महासागरातील जगाच्या सर्वात खोल बिंदू असलेल्या 'मरियाना ट्रेंच' मध्ये गोता लगावण्यात यशस्वी झाली आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितले की, या अभियानातील सदस्य हे शेंगयांग इन्स्टीट्यूट ऑफ ऑटोमेशनचे आहेत.

'हायदू-1' या पाणबुडीने समुद्राच्या सपाटीपासून आतमध्ये तब्बल 10000 मीटरवरील मरियाना ट्रेंचमधील चॅलेंजर डीपमध्ये चारवेळा गोता लगावला आहे. हे वैज्ञानिक 23 एप्रिलपासून या मोहिमेवर होते. जे सोमवारी माघारी परतले आहेत.

या मोहिमेवेळी पानबुडीने अचूकपणे समुद्राची खोली मोजली. तसेच ध्ननी तरंगाच्या माध्यामाद्वारे परिस्थितीचा शोध घेतला. याचबरोबर उच्च गुणवत्तेचे व्हिडीओ पाठविण्यातही यशस्वी ठरली आहे.

चीनच्या सबमर्सिबलने खोल समुद्रातील काही नमुने एकत्र केले आहेत. तसेच भूगर्भातील वातावरणाचे काही फोटोही काढले आहेत. गेल्या काही वर्षांपासून चीनने अशा प्रकारे संशोधन करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या महिन्यात चीनने ७० दिवसांचा युद्धसराव सुरु केला होता. कोरोनामुळे आलेले जगाशी वैर आणि तैवान ताब्यात घेण्याचे मनसुबे यामागचे कारण होते.

याला टक्कर देण्यासाठी अमेरिकेनेही 25 देशांचा युद्धसराव आयोजित केला आहे. हा जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव असून भारतही सहभागी होणार आहे.