शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोकळा श्वास ! 28 जूननंतर या देशात बंधनकारक नसणार मास्क

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:19 PM

1 / 11
देशातील कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, दुसरीकडे गतवर्षी करोनाने थैमान घातलेल्या इटलीत 28 जूनपासून नागरिकांना मुक्त श्वास घेता येणार आहे.
2 / 11
कारण, 28 जूनपासून इटलीमध्ये मास्कविना चालता-बोलता येणार असल्याचे इटलीचे आरोग्यमंत्री यांनी सांगितलंय.
3 / 11
गेल्या वर्षी युरोपमधील इटलीमध्ये करोनामुळे हाहाकार माजला होता. त्यानंतर आता इटलीने करोनावर मात करत मास्क पासून मुक्तता मिळवली आहे.
4 / 11
अवघी सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये करोनाच्या सुरुवातीच्या काळात जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या होती.
5 / 11
त्याच इटलीमध्ये आता मास्क घालणे अनिवार्य नसणार आहे. इटलीमध्ये, २८ जूनपासून मास्क घालणे बंधनकारक नसणार आहे आणि संपूर्ण देश मास्क फ्री होणार आहे.
6 / 11
देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी माहिती देताना मास्कचे बंधन हटविण्यात येत असल्याचे सांगितले.
7 / 11
आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्झा यांनी व्हायरस किती वेगाने पसरत आहे, याबद्दल फेसबुकवर लिहिले आहे. यासाठी इटलीमध्ये वर्गीकरण प्रणाली तयार केली गेली आहे.
8 / 11
त्यानुसार व्हाईट झोनमधील लोकांना आता मास्क घालण्याची गरज भासणार नाही असे म्हटले आहे. २८ जूनपर्यंत इटलीतील सर्व भाग हे ‘व्हाइट’ झोन म्हणून घोषीत केले जातील असे तज्ज्ञांचे मत आहे.
9 / 11
सोमवारी, इटलीमध्ये करोनाचे केवळ ४९५ नवीन रुग्ण आढळून आले. तर २१ लोकांचा मृत्यू झाला.
10 / 11
२०२० च्या सुरुवातीला इटलीमध्ये करोनाव्हायरसचा प्रसार झाल्यापासून, देशातील मृतांची संख्या १ लाख २७ हजार २९१ झाली आहे. ४२.५ लाख नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
11 / 11
आतापर्यंत, १२ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येच्या ३० टक्के लोकांना लसी दिली गेली आहे. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीमध्ये त्यांचा वाटा १.२ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटली