शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अशी आहे उत्तर आणि दक्षिण कोरियामधील सीमारेषा, काही ठिकाणी जाणे ठरू शकते प्राणघातक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 7:43 PM

1 / 12
उत्तर आणि दक्षिण कोरिया देशांमधील वैर जगजाहीर आहे. त्यामुळेच या दोन देशांमधील सीमारेषेची गणना ही जगातील सर्वात धोकादायक सीमारेषांमध्ये होते. आज जाणून घेऊया या सीमारेषेविषयी
2 / 12
कोरियन मिलिट्राइझ झोन हा एक जमिनीचा पट्टा असून, तो उत्तर आणि दक्षिण कोरियाची विभागणी करतो.
3 / 12
दोन्ही देशांना वेगळा करणारा हा जमितीचा पट्टा सुमारे 250 किमी लांब आणि सुमारे चार किमी रुंद आहे. 1953 मध्ये उत्तर कोरिया, संयुक्त राष्ट्रे आणि चीन यांच्यातील करारानंतर ही सीमारेषा अस्तित्वात आली आहे.
4 / 12
1953 मध्ये झालेल्या करारानंतरही उत्तर आणि दक्षिण कोरियामधील वाद संपलेला नाही. दोन्ही देशांमध्ये तांत्रिकदृष्टया आजही युद्ध सुरू आहे. प्रत्यक्ष युद्ध होत नसले तरी वाकयुद्ध सुरू आहे.
5 / 12
उत्तर आणि दक्षिण कोरियामधील या सीमारेषेवर दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आलेले आहे. तसेच या परिसरात काटेरी तारा, भूसुरुंग पेरून ठेवण्यात आलेले आहे.
6 / 12
या परिसरात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असते. सीमारेषेवर जरा जरी काही झाले तरी दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू होतो. त्यामुळे चुकून कुणी या भागात शिरल्यास मृत्यू निश्चित मानला जातो.
7 / 12
सीमारेषेवरील कुठल्याही आपातकालीन परिस्थितीला आणि हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी या परिसरात उत्तर कोरियाने अनेक भुयारे खोदली आहेत.
8 / 12
2011 साली किम जोंग उन उत्तर कोरियाच्या सत्तेवर आल्यानंतर या परिसरात आक्रमकतेत अधिकच वाढ झाली आहे. तसेच उत्तर कोरियाकडून ड्रोन उडवून दक्षिण कोरियाच्या तयारीचा आढावा घेण्याचे प्रयत्नही झाले आहेत.
9 / 12
ही सीमारेषा धोकादायक असतानाही उत्तर कोरियामधून सुमारे 1 हजार लोक दरवर्षी पळून दक्षिण कोरियात जातात. गेल्या काही वर्षांत पलायनाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच पर्यटकांना या भागाचे दर्शन घडवून आणले जाते.
10 / 12
या सीमारेषेवर दोन्ही देश मोठमोठे स्पीकर लावून आपला प्रोपेगेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू असतो. 2004 मध्ये हा प्रकार बंद करण्यात आला होता. मात्र आताही तणाव निर्माण झाल्यास दोन्ही देशांकडून ही रणनीती अमलात आणली जाते.
11 / 12
कोरियन द्विपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पनमुनजोम येथे दोन्ही देशांचे सैनिक एकत्र गस्त घालत असतात.
12 / 12
दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांच्यामध्ये 27 एप्रिल 2018 रोजी ऐतिहासिक भेट झाली होती.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSouth Koreaदक्षिण कोरियाnorth koreaउत्तर कोरिया