कोण आहेत PM मोदींसोबत दिसणाऱ्या या ३८ वर्षीय पंतप्रधान? सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतायत फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:20 IST
1 / 7पंतप्रधान नरेंद्र मोदी बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडला पोहोचले आहेत. बँकॉक येथील सरकारी निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान पाइटोंगटार्न शिनवात्रा (Paetongtarn Shinawatra) यांनी जोरदार स्वागत केले. या क्षणाचे फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.2 / 7थायलंडच्या पंतप्रधान पाइटोंगटार्न शिनावात्रा यांनी आज बँकॉकमधील सरकारी भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जोरदार स्वागत केले, असे ट्विट परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. 3 / 7थायलंडच्या नव्या पंतप्रधान या देशातील सर्वात प्रभावशाली शिनावात्रा घराण्यातील आहेत. हे पद भूषवणाऱ्या त्या सर्वात तरुण व्यक्ती आहेत.4 / 7३८ वर्षीय पाइटोंगटार्न शिनावात्रा या थायलंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. महत्वाचे म्हणजे, त्यांच्या कुटुंबात दोन माजी पंतप्रधानही आहेत.5 / 7माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा, हे त्यांचे वडील होते. ते अब्जाधीश होते. 2001 से 2006 पर्यंत ते पंतप्रधान पदावर होते. लष्करी उठावानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले होते.6 / 7१५ वर्षांच्या स्व-निर्वासनानंतर ते गेल्या वर्षीच थायलंडला परतले आहेत. यामुळे, आता ते थायलंडच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.7 / 7१५ वर्षांच्या स्व-निर्वासनानंतर ते गेल्या वर्षीच थायलंडला परतले आहेत. यामुळे, आता ते थायलंडच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.