शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"क्रॅश, क्रॅश, क्रॅश...", टक्कर होण्याआधी अलर्ट मिळाला होता; अमेरिकेतील विमान अपघातातील माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 17:46 IST

1 / 10
America Plane Crash : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये बुधवारी रात्री पॅसेंजर प्लेन क्रॅश झाले. युएस आर्मीच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरला या विमानाची टक्कर झाली, यामुळे हा अपघात झाला. या विमानात ६४ प्रवासी प्रवास करत होते. पॅसेंजर विमान कॅन्ससमधील विचिटा येथून वॉशिंग्टन डीसीला येत होते.
2 / 10
हे विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत होते यावेळीच हा अपघात झाला. अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत पडली. या अपघातात आतापर्यंत १९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही शोध सुरू आहे.
3 / 10
विमान कोसळण्याच्या ३० सेकंद आधी, रेगन राष्ट्रीय विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाने लष्करी हेलिकॉप्टरला कॉल केला होता. पण लष्करी हेलिकॉप्टरने याला प्रतिसाद दिल नसल्याचे समोर आले आहे.
4 / 10
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन ईगल फ्लाइट ५३४२ या प्रवासी विमानाचा अपघात होण्याच्या ३० सेकंद आधी रेगन राष्ट्रीय विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाने लष्करी हेलिकॉप्टरला अलर्ट देण्यात आला होता. पण त्यांनी याकडे लक्ष दिले नाही.
5 / 10
कंट्रोल रुममधून असं सांगण्यात आले होते की, PAT25, तुम्हाला पुढे CRJ दिसतो का?' काही सेकंदांनंतर, दुसरी सूचना देण्यात आली. 'PAT25 CRJ च्या मागे जा', अशी सूचना होती. पण, या दोन्ही सूचनांचे पालन झाले नसल्याचे दिसत आहे.
6 / 10
हवाई वाहतूक नियंत्रकाच्या या सूचनेला लष्करी हेलिकॉप्टरने प्रतिसाद दिला नाही. काही सेकंदांनंतर, दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली. अपघात पाहणाऱ्या वैमानिकानेही रेडिओवरून लगेच फोन केला आणि म्हणाले, 'टॉवर, तुम्ही पाहिले का...'
7 / 10
विमानातील रेकॉर्डिंग ठेवणाऱ्या LiveATC.net च्या ऑडिओमध्ये लष्करी हेलिकॉप्टरमधील क्रू सदस्यांमधील शेवटचे संवाद रेकॉर्ड केला आहे. एका हवाई वाहतूक नियंत्रकाला 'क्रॅश, क्रॅश, क्रॅश... हा अलर्ट दिला होता,असे म्हणताना ऐकू येते.
8 / 10
कॅससहून वॉशिंग्टन डीसीला जाणाऱ्या विमानात ६० प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते, असे अमेरिकन एअरलाइनने सांगितले. त्याची अमेरिकन आर्मीच्या ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरशी टक्कर झाले, यामध्ये ३ सैनिक होते. हेलिकॉप्टरमध्ये कोणताही वरिष्ठ लष्करी अधिकारी नव्हता.
9 / 10
अमेरिकन एअरलाइन्सने ८००-६७९-८२१५ हा टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
10 / 10
यासोबतच, अमेरिकेबाहेरील लोकांना संपर्कासाठी news.aa.com ला भेट देण्यास सांगण्यात आले आहे.
टॅग्स :airplaneविमानAccidentअपघात