शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेचे अफगाणिस्तानात जबरदस्त बॉम्ब हल्ले; उद्धवस्त केले तालिबानचे अड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 5:27 PM

1 / 10
तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांवर कब्‍जा केल्यानंतर, तसेच त्यांच्या रक्तरंजित खेळामुळे अमेरिका पुन्हा एकदा अॅक्‍शन मोडमध्ये आली आहे. अमेरिकन हवाईदलाच्या लढावू विमानांनी आणि ड्रोनने तालिबानच्या तळांवर रात्रभर जबरदस्त हल्ले चढवले. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने याची पुष्टी केली आहे. (America launched recent air strikes in afghanistan to repel taliban offensive says pentagon)
2 / 10
सांगण्यात येते, की अमेरीकन सैन्य अफगाणिस्तानातून परतत असताना अमेरिकेकडून करण्यात आलेला हा पहिला हवाई हल्ला आहे. हिंसाचार बंद केला नाही, तर आम्ही हवाई हल्ले करू, असा इशाराही अमेरिकेने तालिबानला दिला होता.
3 / 10
व्हाइस ऑफ अमेरिकेच्या रिपोर्टनुसार, या हल्ल्यात अशा सैन्‍य उपकरणांना आणि शस्त्रास्त्रांना टार्गेट करण्यात आले होते, ज्यावर तालिबानने कब्‍जा केला होता. तालिबानने हे अफगाण सैन्याकडून हिसकावले होते.
4 / 10
सांगण्यात येते, की हे हल्ले कंदहारमध्ये करण्यात आले आहेत. येथे तालिबानी दहशतवादीही सातत्याने हल्ले करत आहेत. अनेक जण दावा करत आहेत, की या हल्ल्यात अमेरिकेने आपल्या लांब पल्ल्याच्या बॉम्‍बरचा वापर केला.
5 / 10
अफगाणिस्तानच्या अर्ध्या भागावर तालिबानचा कब्जा - एपीच्या वृत्तानुसार, अमेरिकेने तालिबानच्या छापेमारीचा सामना करत असलेल्या अफगाण संरक्षण दलाच्या मदतीसाठी अनेक वेळा अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले आहेत. नुकतेच अमेरिकेच्या एका सर्वात वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याने म्हटले होते, की तालिबानने अफगाणिस्तानच्या 400 हून अधिक जिल्ह्य केंद्रांवर कब्जा केला आहे. यातच अफगाणिस्तानत अमेरिकेच्या हवाई हमल्याच्या बातम्या आल्या आहेत.
6 / 10
सीएनएनच्या एका वृत्तानुसार, एक संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले आहे, की गेल्या 30 दिवसांत अमेरिकन सेन्याने जवळपास सहा ते सात हवाई हल्ले केले आहेत. यांपैकी अधिकांश हल्ले ड्रोनने करण्यात आले.
7 / 10
अमेरिक सैन्याच्या माघारीची 95 टक्क्यांहून अधिक प्रक्रिया पूर्ण - अमेरिकेने म्हटले आहे, की अफगाणिस्तानातील अमेरिकन सेन्याच्या माघारीची 95 टक्क्याहून अधिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे, की सेन्या परत येण्याची प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होईल.
8 / 10
तालिबानी दहशतवाद्यांचा राजधानी काबुलच्या दिशेने कूच - अफगाणिस्तानमधून अमेरिकेने 20 वर्षांपासून तळ ठोकून असेलेले सैन्य माघारी घ्यायला सुरुवात केल्यानंतर तालिबानने पुन्हा कब्जा करायला सुरुवात केली आहे. कंदहार सारख्या शहरांना ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी दहशतवादी राजधानी काबुलच्या दिशेने कूच करू लागले आहेत.
9 / 10
तालिबानच्या ताब्यात महत्वाची पोस्ट - अफगाणिस्तानचे अशरफ गनी सरकार सध्या काहीच पोस्टवर आपला ताबा ठेवून आहेत. इराण, पाकिस्तानच्या सीमेवरून 2.9 अब्ज डॉलरचा व्यापार होतो. तालिबानच्या ताब्यात यापैकी 0.9 अब्ज डॉलरचा व्यापार होणारी पोस्ट गेली आहेत.
10 / 10
उरलेल्या पोस्टवर तालिबान कब्जा करण्यासाठी रणनिती आखत आहे. अमेरिकेला या तालिबानच्या खतरनाक प्लॅनची चिंता वाटू लागली आहे.
टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाterroristदहशतवादीAfghanistanअफगाणिस्तान