शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकेत कोरोना लसीची सर्वात मोठी चाचणी, ३० हजार स्वयंसेवकांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 1:34 PM

1 / 11
वॉशिंग्टन - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरतील अनेक देश लस तयार करण्यात व्यस्त आहेत. अमेरिकेची फार्मा कंपनी मॉडर्नाची (Moderna Inc) लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कंपनीने ३०,००० प्रौढांवर चाचण्या सुरू केल्या आहेत. यात अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांना श्वसनाचा काही त्रास नाही.
2 / 11
अमेरिका सरकारने या लसीच्या प्रोजेक्टसाठी जवळपास एक अब्ज डॉलर्सचे सहकार्य केले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, वर्षाच्या अखेरीस ही लस बाजारात येऊ शकते.
3 / 11
जगभरात 150 हून अधिक कोरोनावरील लसीच्या चाचण्या आता वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. दोन डझन लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. दरम्यान, मॉडर्ना आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लस चाचणीच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
4 / 11
या वर्षाच्या अखेरीस कंपन्या लस बाजारात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात, ही लस किती सुरक्षित आहे आणि विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी किती प्रभावी आहे, हे पाहिले जाणार आहे.
5 / 11
कोरोनोपासून रुग्णांना वाचवण्यासाठी ही लस किती प्रमाणात सक्षम आहे, हे यामध्ये पाहिजे जाणार आहे. वर्षाला ५०० कोटी लसींची निर्मिती करण्यासाठी तयार असल्याचे मॉडर्नाने म्हटले आहे. तसेच, ही क्षमता वर्षाकाठी एक अब्जपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही म्हटले आहे.
6 / 11
दुसरीकडे, ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लस अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची मानवी चाचणी यशस्वी झाली आहे. सुरक्षित असण्याबरोबरच ही लस देखील शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम करते.
7 / 11
ज्यांना ही लस देण्यात आळी आहे. त्यांच्या शरीरात विषाणूशी लढणाऱ्या अँटीबॉजीसोबत पांढर्‍या रक्त पेशी आढळल्या आहेत. ज्यामुळे शरीराला जास्तकाळ प्रतिकारशक्ती मिळते.
8 / 11
सामान्यत: कोणत्याही लसीवर चाचणी करण्यासाठी जास्त वेळ लागते आणि विकसित होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. पूर्वी, लस तयार होण्यास अनेक वर्षे लागली होती. यासाठी अनेक साथीच्या रोगांची उदाहरणे आहेत.
9 / 11
पांढर्‍या रक्त पेशींना किलर टी-सेल्स म्हणूनही ओळखले जाते. अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या तिसर्‍या आणि अंतिम मानवी चाचणीसाठी देशातील पाच ठिकाणे निश्चित केली आहेत. चाणणीची संपूर्ण तयारी केली गेली आहे. या टप्प्यात, लसची चाचणी हजारो लोकांवर केली जाईल.
10 / 11
सामान्यत: कोणत्याही लसीवर चाचणी करण्यासाठी जास्त वेळ लागते आणि विकसित होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. पूर्वी, लस तयार होण्यास अनेक वर्षे लागली होती. यासाठी अनेक साथीच्या रोगांची उदाहरणे आहेत.
11 / 11
मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ही लस लवकरच तयार होण्याची अपेक्षा आहे. सध्या जगात दीडशेहून अधिक लसींवर काम सुरु आहे. यापैकी बहुतेक लसी नुकत्याच प्री-क्लिनिकल चाचणीसाठी पोहोचल्या आहेत. दुसर्‍या किंवा तिसर्‍या टप्प्यात असलेल्या अशा काही लसी आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका