शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 13:57 IST

1 / 7
अमेरिकेच्या सहा विमानांनी शनिवारी सायंकाळीच इराणकडे क्लस्टर बॉम्बसोबत झेप घेतली होती. रात्री या विमानांनी इराणच्या अणू स्थळांवर जोरदार हल्ले केले. तीन अणू स्थळांवर हल्ले केल्याने इराण चवताळला आहे. त्याने लगेचच इस्रायलवर ३० हून अधिक बॅलेस्टीक मिसाईल डागली आहेत.
2 / 7
या हल्ल्यांनंतर इराणने अणुतळांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या आकाशात अमेरिकेची विमाने होती. जवळपास ३७ तास ही विमाने हवेतच होती. याकाळात अनेकदा या विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यात आले.
3 / 7
फोर्डोवर ६ बंकर बॉम्ब टाकण्यात आले आणि ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी इतर इराणी अणुस्थळे नष्ट करण्यात आली. अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागॉननेही इराणी हल्ल्यात अमेरिकन बी-२ बॉम्बर्सचा सहभाग असल्याची पुष्टी केली आहे.
4 / 7
अमेरिकेने जरी यशस्वी हल्ला केल्याचा दावा केला असला तरी इराणने आमच्या अण्वस्त्रांच्या ठिकाणांना कोणतेही नुकसान झालेले नाहीय. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच रेडिएशन लीकही झालेले नाहीय, असे म्हटले आहे. इराणच्या सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे. इराणची अणुउर्जा संस्था (AEOI) ने ही माहिती जाहीर केली आहे.
5 / 7
सुरक्षा तपासणीत कोणतेही रेडिएशन झाल्याचे समोर आले नाही. आमच्यावर कितीही हल्ले झाले तरीही आम्ही आमचा अण्वस्त्र कार्यक्रम पुढे सुरु ठेवणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी इराणी जनतेला दिले आहे. इराणच्या अणुऊर्जा संस्थेने या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे. इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्यांचा निषेध करण्याचे आणि शांततापूर्ण अणुविकासाच्या इराणच्या अधिकाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
6 / 7
रविवारी सकाळीच अमेरिकेच्या बी२ बॉम्बर्सनी फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील अणुस्थळांना लक्ष्य केले. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या फ्लाइट ट्रॅकिंग डेटा आणि ऑडिओ कम्युनिकेशन्सनुसार अमेरिकेतील मिसूरी येथील व्हाइटमन एअर फोर्स बेसवरून ग्वाममधील यूएस एअर फोर्स बेसवर ही विमाने जाताना दिसली होती. विमानात मोठा पेलोड असल्याने जास्त इंधन न घेताच ही विमाने झेपावली होती.
7 / 7
मिसूरीहून उड्डाण केल्यानंतर या बी-२ स्टेल्थ बॉम्बर्सनी पॅसिफिक महासागरावर हवेतच इंधन भरले. बी-२ स्टील्थ फायटर विमान एकावेळी दोन बंकर बस्टर बॉम्ब घेऊन जाऊ शकते. सध्यातरी केवळ अमेरिकेकडेच हे बॉम्ब आहेत. अणुस्थळ फोर्डोला हेच बॉम्ब नष्ट करू शकतात. परंतू त्यासाठी सातत्याने बॉम्बफेक करावी लागणार आहे. यामुळे अमेरिकेने दोन ते तीन विमानवाहू युद्धनौका इराणच्या दिशेने पाठविल्या आहेत. तसेच ३० हून अधिक इंधनवाहू विमाने देखील पाठविली आहेत.
टॅग्स :Israelइस्रायलAmericaअमेरिकाIranइराणwarयुद्ध