शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळ ग्रहावर ६ वेळा ऐकू आला Alien च्या ढेकरीचा आवाज, NASA च्या क्यूरिओसिटी रोवरकडे आहे पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 1:31 PM

1 / 10
मंगळ ग्रहावर वैज्ञानिकांना एलियनची ढेकर ऐकू (Alien Burp) आली. याचा पुरावा नासाच्या क्यूरिओसिटी रोवरने मिळवला आहे. आता याचा शोध घेतला जात आहे की, ही ढेकर काय आहे आणि याचा स्त्रोत काय आहे. कारण क्यूरिओसिटी रोवरने मंगळ ग्रहावर उतरल्यापासून आतापर्यंत ६ वेळा ढेकर सारखा आवाज रेकॉर्ड केला आहे. मात्र, आजूबाजूला आवाज हा आवाज काढणारं कुणी दिसत नाही. नासाच्या वैज्ञानिकांसाठी ही घटना हैराण करणारी आहे.
2 / 10
मंगळ ग्रहावर नासाचा क्यूरिओसिटी रोवर २०१२ मध्ये उतरला होता. याची लॅडींग गेल क्रेटरमध्ये केली गेली होती. तेव्हापासून आतापर्यंत याने ६ वेळा ढेकरचा आवाज रेकॉर्ड केला आहे. हा ढेकरसारखा आवाज कुठून येतोय हेच वैज्ञानिकांना समजत नाहीये.
3 / 10
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यू ऑफ टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांनुसार, हा मीथेन गॅसचे बुडबुडे फुटण्याचा आवाज आहे. पण या स्त्रोत दिसून येत नाहीये. हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी एक म़ॉडल तयार केलं. ज्यात त्यांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की, मीथेन गॅसचे कण वेगळे होतात तेव्हा वेगवेगळ्या पॅकेट्स फॉर्मेशन होतं. त्यामुळे वैज्ञानिक मंगळ ग्रहावरील हवेची गती आणि दिशेचा अभ्यास करत आहेत. सोबतच आवाज येण्याचा संभावित अंतराचा अंदाज घेत आहेत.
4 / 10
मात्र, एलियनच्या ढेकराची तंतोतंत माहिती मिळवणं अवघड असेल. रारण CIT च्या मॉडलनुसार काही ढेकरांचं अंतर हे अनेक किलोमीटर दूर असू शकतं. तिथपर्यंत जाण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे तिथे जाऊन बघणं शक्य नाही.
5 / 10
CIT च्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, गेल क्रेटरच्या दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात मीथेन सक्रीय असल्याचा डेटा मिळाला आहे. होऊ शकतं की, येथूनच एलियनच्या ढेकरासारखा आवाज येत असेल. हा केवळ एक योगायोग असू शकतो. पण त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
6 / 10
वैज्ञानिकांसाठी मंगळ ग्रहावर मीथेन गॅस असणं फार हैराण करणारं आहे. कारण पृथ्वीवर मीथेन गॅसचं उत्सर्जन जैविक प्रक्रियेतून होतं. म्हणजे जीवांद्वारे होतं. त्यामुळे मंगळ ग्रहावर मीथेन गॅसचे बुडबुडे फुटणं किंवा असे एलियनच्या ढेकरसारखे आवाज येणं हे दर्शवतं की, इथे जीवनाची शक्यता आहे.
7 / 10
जर मीथेन जैविक प्रक्रियेतून तयार होत असेल तर ही एखादी भूगर्भीय हालचाल असू शकते. असं असेल तर इथे पाणी असण्याचेही पुरावे मिळतात. ज्यामुळे जीवन असू शकतं.
8 / 10
क्यूरिओसिटी रोवरमध्ये एक यंत्र लावलं आहे ज्याचं नाव आहे टुनेबल लेजर स्पेक्ट्रोमीटर. हे तेच यंत्र आहे ज्याने एलियनची ढेकर ऐकली. तिला रेकॉर्ड केलं. म्हणजे हे यंत्र सतत मीथेन गॅस असण्याला रेकॉर्ड करत आहे. हे एक संवेदनशील यंत्र आहे.
9 / 10
NASA चे वैज्ञानिक म्हणाले की, आतापर्यंत हे समजू शकलेलं नाही की मीथेन गॅस कुठून तयार होतो. होऊ शकतं की, इथे छोट्या मायक्रोब्सच्या रूपात जीवन असेल. कारण मीथेन गॅसचं जीवन ३३० वर्षे आहे. यादरम्यानच त्याला डिटेक्ट केलं जाऊ शकतं. त्यानंतर तो सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतो. याचा अर्थ हा आहे की, जिथेही मीथेन निर्माण होत आहे तो स्त्रोत अजूनही सक्रिय आहे.
10 / 10
NASA चे वैज्ञानिक म्हणाले की, आतापर्यंत हे समजू शकलेलं नाही की मीथेन गॅस कुठून तयार होतो. होऊ शकतं की, इथे छोट्या मायक्रोब्सच्या रूपात जीवन असेल. कारण मीथेन गॅसचं जीवन ३३० वर्षे आहे. यादरम्यानच त्याला डिटेक्ट केलं जाऊ शकतं. त्यानंतर तो सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतो. याचा अर्थ हा आहे की, जिथेही मीथेन निर्माण होत आहे तो स्त्रोत अजूनही सक्रिय आहे.
टॅग्स :NASAनासाInternationalआंतरराष्ट्रीय