शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रशियन मुलींना सरकार का देणार ८१ हजार?; पुतिन यांची रणनीती, देशात आखलं नवं धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:13 IST

1 / 10
जगभरात अनेक देश वेगाने घटणाऱ्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहेत. जपान, चीन, उत्तर कोरियासारख्या देशांवर लोकसंख्या घटीचं संकट निर्माण झालं आहे. त्याच यादीत आता रशियाचंही नाव जोडले आहे. ज्याठिकाणी लोकसंख्येत घट होत असल्याने सरकारसमोर आव्हान उभे राहिले आहे.
2 / 10
लोकसंख्येत होणारी घट पाहता रशिया सरकारनं हे आव्हान पेलण्यासाठी नवीन योजना सुरू केली आहे. सरकार आता कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींपासून सर्व वयाच्या महिलांना रोकड पैसे देऊन कुटुंब वाढवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. ही योजना नेमकी कशी असेल आणि कोणत्या महिलांना त्याचा लाभ मिळेल हे जाणून घेऊ
3 / 10
रशियात जन्मदर खूप वेगाने कमी होत आहे. रशियात जन्म दराने गेल्या २५ वर्षाचा निचांक गाठला आहे. २०२४ मध्ये केवळ ५ लाख ९९ हजार ६०० मुले रशियात जन्माला आली. जी मागील वर्षीच्या तुलनेने १६ हजार पेक्षा कमी होती. १९९९ नंतर हा सर्वात कमी आकडा आहे.
4 / 10
जून २०२४ मध्ये ही स्थिती आणखी खराब झाली जेव्हा इतिहासात पहिल्यांदाच मासिक जन्म दर १ लाखाहून कमी आला आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे अनेक युवकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशासमोर युवा वर्गाचा अभाव निर्माण झाला आहे. युवकांची संख्या कमी होणे आणि वृद्धांची देखभाल आणि कामकाजावर परिणाम होत आहे.
5 / 10
दोन स्तरावर मिळणार महिलांना फायदा - युवा वर्ग मुल जन्माला घालण्यासाठी तयार व्हावा, नवी पिढी ही कमतरता भरून काढेल जेणेकरून देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती टिकेल यासाठी रशिया सरकारने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मुल जन्माला घालण्यासाठी रोकड बक्षीस देण्याचं जाहीर केले.
6 / 10
१ जानेवारीपासून लागू होणाऱ्या योजनेनुसार, जन्मलेल्या बाळाची आई कुठल्याही स्थानिक विद्यापीठ अथवा कॉलेजमध्ये फुल टाईम विद्यार्थिनी हवी. जिचे वय २५ वर्षापेक्षा कमी असायला हवे. मुलांच्या संगोपनासाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य आणि सुविधा दिल्या जातील. त्यात प्रादेशिक योजना आणि राष्ट्रीय मातृत्व लाभ दिला जाईल.
7 / 10
प्रादेशिक योजना - १ जानेवारी २०२५ पासून जवळपास राज्य सरकार अशा महिला कॉलेज युवतींना १ लाख रूबल म्हणजे ९१० डॉलर(८१ हजार रुपये) प्रोत्साहन रक्कम देतील जे निरोगी बालकाला जन्म देतील. करीलिया,टोम्स्कमध्ये युवती राहायला हव्यात आणि फुल टाईम विद्यार्थिनी हव्यात. जर मुल मृत जन्माला आले तर ही रक्कम मिळणार नाही.
8 / 10
राष्ट्रीय मातृत्व लाभ - २०२५ मध्ये पहिल्यांदा आई बनणाऱ्या महिलांना आता ६,७७,००० रूबल ( ५ लाख २२ हजार रुपये) मिळतील जे २०२४ मध्ये ६,३०,४०० रूबल होते. दुसऱ्या मुलासाठी ही रक्कम ८,९४,००० रूबल करण्यात आली आहे जी २०२४ मध्ये ८, ३३, ००० रूबल होती.
9 / 10
रशियाने केवळ आर्थिक मदत दिली नाही तर अनेक पाऊले उचलली आहेत. ज्यात सरकारने गर्भपाताचे नियम कठोर केलेत जेणेकरून महिला गर्भपात करणार नाहीत. कौटुंबिक जीवन सकारात्मक दाखवण्यासाठी रशियन मिडिया जोर देत आहे. मॉम एट १६ नावाने रियलिटी शो पुढे आला आहे ज्यात कमी वयात आई बनण्यासाठी प्रेरित केले जात आहे.
10 / 10
२०३६ पर्यंत लोकसंख्येतील घट थांबवणे सरकारचं उद्दिष्ट आहे. ही योजना २ टप्प्यात विभागली गेली आहे. २०२५-३० पहिला टप्पा, ज्यात जन्मदर १.६ मुले प्रति महिला केले जाईल. दुसरा टप्पा २०३१-२०३६ या काळात राबवला जाईल. रशियन सरकारच्या या नव्या योजनेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. केवळ पैशासाठी मुल जन्माला घालण्यासाठी मुली तयार होतील का असं विचारले जात आहे.
टॅग्स :russiaरशियाchinaचीनJapanजपानVladimir Putinव्लादिमीर पुतिन