शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:08 IST

1 / 9
या पृथ्वीतलावर अशी एक रहस्यमयी जागा आहे ती देखील समुद्रात जिने आजतागायत २० विमाने आणि ५० हून अधिक जहाजे गायब केली आहेत. हो ती जागा तुम्ही देखील ऐकलेली आहे. या जागेला बर्म्युडा ट्रँगल असे म्हटले जाते. ७ ऑगस्टला दोघांच्या छोटेखानी विमान बेपत्ता होण्याने पुन्हा एकदा हे रहस्य चर्चेत आले आहे.
2 / 9
टास्मानियातील जॉर्जटाऊनहून न्यू साउथ वेल्समधील हिल्स्टनला जाण्यासाठी ७२ वर्षीय ग्रेगरी वॉन आणि ६६ वर्षीय किम वॉर्नर निघाले होते. समुद्रातून ते गेले परंतू त्यांचा पत्ताच लागला नाही. त्यांचे विमान त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचले नाही आणि बास स्ट्रेटच्या या धोकादायक समुद्राने पुन्हा एकदा जुनी मढी उकरून काढायला सुरुवात केली.
3 / 9
गेल्या कित्येक शतकांपासून बर्म्युडा ट्रँगल आणि बास स्ट्रेट ट्रँगल या दोन जागांवरून अनेक कहाण्या सांगितल्या जातात. एकट्या बर्मुडा ट्रँगलचा कुख्यात इतिहास १७ व्या शतकापासूनचा आहे. १७९७ मध्ये, स्लूप नावाचे एलिझा जहाज सिडनी कोव्हच्या ढिगाऱ्यातून माल काढत असताना बेपत्ता झाल्याची पहिली नोंद आहे.
4 / 9
१८३८-४० दरम्यान सात जहाजे, १८५८ मध्ये ब्रिटिश युद्धनौका एचएमएस सॅफो, १९०१ मध्ये एसएस फेडरल आणि १९०६ मध्ये एसएस फर्डिनांड फिशर अशी अनेक जहाजे रहस्यमयरित्या गायब झालेली आहेत. ज्यांचा आजही काहीच मागमूस लागलेला नाही.
5 / 9
१९४५ मध्ये सर्वाधिक चर्चित घटना घडली होती, फ्लाइट १९ दुर्घटना म्हणून ओळखली जाते. यामध्ये अमेरिकेचा ५ बॉम्बर विमाने बेपत्ता झाली होती. १४ जण गायब झाले होते. या विमानांच्या रेस्क्यूसाठी गेलेले जहाज आणि विमानही या भागात गायब झाले होते.
6 / 9
बास स्ट्रेट ट्रँगल हा ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियामधील समुद्री क्षेत्र आहे. १९७८ मध्ये ० वर्षीय पायलट फ्रेडरिक व्हॅलेंटिच सेस्ना १८२ एल विमान घेऊन जात होता. तेव्हा त्याने विचित्र, धातूची वस्तू त्याच्यावर घिरट्या घालत असल्याचा संदेश पाठविला होता, यानंतर तो विमानासह गायब झाला होता. १९७३ मध्ये एमव्ही ब्लायथ स्टार नावाचे एक जहाज देखील गायब झाले होते. कालांतराने या जहाजाचे अवशेष सापडले होते.
7 / 9
अशाप्रकारे रहस्यमयी गायब होण्यावरून अनेक चर्चा आहेत. समुद्रातील राक्षस, एलियन, रहस्यमयी शक्ती या जहाजांना आपल्याकडे ओढून घेते असे सांगणारी अनेक पुस्तके, टीव्ही शो तुम्हाला दिसतील. परंतू, एका ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञाने यावर संशोधन केले आहे.
8 / 9
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ एओएलचा असा विश्वास आहे की खराब हवामान आणि मानवी चूक याला जबाबदार आहेत. त्याने २०१० ला याबाबत माहिती स्पष्ट केली आहे. याला अमेरिका, लंडनचा देखील पाठिंबा मिळाला आहे. बर्म्युडा ट्रँगलमध्ये इतक्या मोठ्या संख्येने जहाजे आणि विमाने गूढपणे गायब झाल्याचा कोणताही पुरावा नाही. महासागराच्या इतर कोणत्याही मोठ्या भागात अशा घटना जास्त वेळा घडतात, असे त्याचे म्हणणे आहे.
9 / 9
तर दुसरे शास्त्रज्ञ क्रुझेलनिकी यांनी २०१७ मध्ये जास्त रहदारी आणि कठीण नेव्हिगेशनमुळे अशा घटना घडत असल्याचे म्हटले आहे. तर तिसरा शास्त्रज्ञ लंडनमधील लॉयड्स यांनी गल्फ स्ट्रीममध्ये अचानक हवामान बदल, नेव्हिगेशनला गुंतागुंतीचे करणारे कॅरिबियन बेटांचा चक्रव्यूह आणि कंपासला गोंधळात टाकणारे दुर्मिळ चुंबकीय लहरी याला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाSea Routeसागरी महामार्गAmericaअमेरिकाAustraliaआॅस्ट्रेलिया