शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगात सर्वात बेक्कार ट्रॅफिकवाली 10 शहरं, भारतातल्या चार शहरांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 11:02 PM

1 / 6
ट्रॅफिकमधून गाडी चालवण्यासारखा कंटाळवाणा प्रकार नाही. अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यानं इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब होतो. गाडीत बसल्या बसल्या काय करावं तेच सुचत नाही.
2 / 6
गाडीत बसल्या बसल्या काय करावं तेच सुचत नाही. विशेष म्हणजे जगभरात अशी अनेक शहरं आहेत, जिकडे ट्रॅफिकची समस्या आहे. वाहतूक कोंडीच्या यादीत दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरांचाही समावेश आहे.
3 / 6
या यादीत 6 महाद्विपांमधल्या 57 देशांपैकी 416 शहरांचा समावेश आहे. In-Vehicle Navigation Company, TomTom यांनी वार्षिक ट्रॅफिक इंडेक्स जारी केला आहे. TomTomच्या आकड्यांनुसार भारतात सर्वाधिक ट्रॅफिक आहे.
4 / 6
10 मोठ्या वाहतुकीची कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये भारतातल्या बंगळुरु, दिल्ली, मुंबई आणि पुण्याचा समावेश आहे. बंगळुरूनंतर 71 टक्के ट्रॅफिकसह फिलिपिन्सच्या मनिलाचा नंबर लागतो.
5 / 6
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर भारतातली मुंबई आणि पुणे ही शहरं आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर बोगोटा हे शहर आहे.
6 / 6
भारताची राजधानी असलेलं दिल्ली हे आठव्या स्थानी आहे. तर मास्को (रशिया), लीमा (पेरू), इस्तांबुल (तुर्की) आणि जकार्ता (इंडोनेशिया) क्रमशः 6व्या, 7व्या, 9व्या आणि 10व्या स्थानावर आहेत.