शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दररोज व्हाईट ब्रेड खाता; मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 10:57 PM

1 / 6
अनेक जण सकाळी नाश्त्यात व्हाईट ब्रेड खातात. ब्रेड ऑम्लेट, ब्रेड जॅम यासारखे पदार्थ अनेकांच्या नाश्त्यात असतात. मात्र व्हाईट ब्रेड शरीरासाठी फारसा चांगला नाही. विशेषत: महिलांच्या आरोग्यावर व्हाईट ब्रेडचे विपरित परिणाम होतात.
2 / 6
व्हाईट ब्रेड खाल्ल्यानं नेमकं काय होतं, हे पाहण्यासाठी फूड डायरीजनं जवळपास ५० हजार महिलांच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
3 / 6
व्हाईट ब्रेड आरोग्यासाठी चांगला नाही. त्यामुळे शरीरातल्या साखरेचं प्रमाण वाढतं.
4 / 6
व्हाईट ब्रेड खाल्ल्यानं शरीर एका विशिष्ट प्रकारचं हार्मोन बाहेर सोडू लागतं. त्यामुळे माणसाची झोप कमी होते. व्हाईट ब्रेड खाणाऱ्या व्यक्तीला उशिरापर्यंत झोप येत नाही.
5 / 6
शरीरातून बाहेर पडणाऱ्या हार्मोनमुळे प्रचंड भूक लागते. त्यामुळे स्थूलत्व वाढतं.
6 / 6
जवळपास ५० हजार महिलांशी संवाद साधून, त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्यानंतर व्हाईट ब्रेडचे धोके समोर आले.