शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्याच्या नादात लिंबाच्या रसाचं जास्त सेवन करता? होतील हे 5 गंभीर परिणाम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:58 IST

1 / 8
प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. तशाच लिंबाच्या दोन बाजू आहेत. आंबट खाणाऱ्यांना लिंबू आवडतं त्यामुळे त्यांना प्रत्येक पदार्थांत लिंबू हवं असतं. आता तर अनेकजण वजन कमी करायचं म्हणूनही दिवसातून दोन-तिनदा लिंबू पाण्याचं सेवन करतात. पण तुम्ही असा विचार करत असाल की, लिंबाच्या सेवनाने तुमचं आरोग्य पूर्णपणे चांगलं राहतं तर तुम्ही चुकताय. कोणत्याही गोष्टीचं प्रमाण जास्त झालं की, ते नुकसानकारकच असतं.
2 / 8
जे लोक जास्त लिंबू पाणी घेतात, त्यांना याचे अनेक साईड इफेक्ट्स होऊ शकतात. याच्या जास्त सेवनामुळे शरीरात व्हिटॅमिन सी चं प्रमाण अधिक होतं. लिंबू हे फार जास्त अॅसिडीक असतं त्यामुळे याच्या जास्त सेवनाने तुम्हाला अॅसिडीटीही होऊ शकते.
3 / 8
जे लोक रोज लिंबू पाणीचं सेवन करतात, त्यांनी दिवसातून २ कपांपेक्षा जास्त लिंबू पाणी सेवन करु नये. चला जाणून घेऊ लिंबाचं अधिक सेवन केल्याने शरीराला काय साईड इफेक्ट होतात...
4 / 8
१) दातांना थंड-गरम लागणे - जर तुम्हाल लिंबू खाणे पसंत आहे आणि तुम्ही याचं जास्त सेवन करत असाल तर याचा तुमच्या दातांवर वाईट प्रभाव पडू शकतो. लिंबूमध्ये सिट्रस अॅसिड असतं जे दातांना लागल्यावर दातांच्या कोटिंगचं नुकसान होतं. जर लिंबू पाण्याचं सेवन करायचंच असेल तर स्ट्रॉ चा वापर करु शकता.
5 / 8
१) दातांना थंड-गरम लागणे - जर तुम्हाल लिंबू खाणे पसंत आहे आणि तुम्ही याचं जास्त सेवन करत असाल तर याचा तुमच्या दातांवर वाईट प्रभाव पडू शकतो. लिंबूमध्ये सिट्रस अॅसिड असतं जे दातांना लागल्यावर दातांच्या कोटिंगचं नुकसान होतं. जर लिंबू पाण्याचं सेवन करायचंच असेल तर स्ट्रॉ चा वापर करु शकता.
6 / 8
३) हाडे होऊ शकतात कमजोर - लिंबाच्या जास्त सेवनामुळे तुमची हाडे कमजोर होऊ शकतात. याचं कारण आधी सांगितलं तसं यात सिट्रस अॅसिड अधिक असतं. त्यामुळे लिंबूचं सेवन योग्य प्रमाणातच केलेलं बरं.
7 / 8
४) शरीरात पाणी होतं कमी - जर तुम्ही लिंबू पाण्याचं बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करत असाल तर हे कमी करा. लिंबू पाण्याच्या जास्त सेवन केल्याने शरीरातील आवश्यक पोषत तत्वे शोषून घेतं. यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.
8 / 8
५) किडनी स्टोनची समस्या - लिंबामध्ये आम्ल असण्यासोबतच याची ऑक्सलेट लेव्हलही जास्त असते. ज्यामुळे हे शरीरात जाऊन क्रिस्टलही तयार करु शकतं. हे क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट तुमच्या किडनीमध्ये जाऊन स्टोन तयार करतं. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही लिंबाचं सेवन कराल तेव्हा त्यांच्या प्रमाणावर लक्ष द्या.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स