By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 16:22 IST
1 / 6आज प्रत्येकाला घडाळ्याच्या काट्यासोबत धावावं लागतं. कामाच्या आणि घरगुती कारणामुळे स्वत: साठी मोकळा न मिळाल्यामुळे तणाव वाढतो. अशावेळी तणाव कमी करायचा कसा हे जाणून घेऊया.2 / 6सकाळी लवकर उठून स्वच्छ हवा घ्या, मग अशा वेळी सकाळचं प्रसन्न वातावरण मन प्रफुल्लित करतं. 3 / 6रोज सकाळी उठल्यावर घरातील दरवाजे, खिडक्या उघडा. बाहेरची ताजी हवा आणि सूर्यकिरणं घरामध्ये येऊ द्या. त्यामुळे मन शांत होते आणि आपली चीडचीड कमी होऊन काम करण्यास उत्साह येईल.4 / 6व्यायाम केल्याने तणाव कमी होतो. त्यामुळे रोज सकाळी मोकळ्या वातावरणात व्यायाम करा. 5 / 6दिवसाची सुरुवात चांगली करायची असल्यास तुम्ही तुमच्या आवडीची गाणी ऐका. तसेच थोडसं चिंतन करा जेणेकरून शरीरातील थकवा दूर होईल.6 / 6कामाचं योग्य नियोजन नसल्यास कित्येकदा तणाव निर्माण होतो. त्यामुळे रोज रात्री आठवणीने अलार्म लावा. सकाळी उठल्यावर दिनक्रम ठरवा म्हणजे तुम्ही ठरवलेली कामं वेळेत पूर्ण करू शकाल.