By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 11:00 IST
1 / 10आजच्या काळात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका खूप वाढला आहे. यासाठी तणाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी, अस्वस्थ जीवनशैली, झोप न लागणे, दारू आणि सिगारेटचे अतिसेवन कारणीभूत आहे. हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी, शरीरात दिसणारे संकेत आणि लक्षणांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 2 / 10अशाच काही समस्यांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका खूप वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. या समस्यांना लोक किरकोळ समजून दुर्लक्ष करतात, परंतु जर या समस्या वाढल्या तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका खूप वाढू शकतो.3 / 10कोलेस्टेरॉल हा वॅक्ससारखा पदार्थ आपल्या शरीरात असतो. जेव्हा शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा ते रक्तवाहिन्यांना ब्लॉक करते ज्यामुळे योग्य प्रमाणात रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही आणि यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, आहारात फायबर, कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करणे आणि दररोज व्यायाम करणे महत्वाचे आहे.4 / 10जेव्हा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसते तेव्हा ते तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकते. अशा परिस्थितीत, आपण निरोगी आहार घेणे आणि आपल्या रक्तातील साखरेची पातळी वेळोवेळी तपासणे महत्वाचे आहे.5 / 10उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीय वाढतो. उच्चरक्तदाबामुळे रक्तदाबाची पातळी खूप वाढते. जेव्हा तुमचा रक्तदाब जास्त असतो तेव्हा तुमच्या हृदयाला जास्त काम करावे लागते. अशा परिस्थितीत तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. 6 / 10कमी सोडियम आणि कमी चरबीयुक्त आहार, व्यायाम करून तुम्ही रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवू शकता. यासोबतच, तुम्ही अल्कोहोलचे सेवन कमीत कमी करा आणि तणाव न घेता आणि निरोगी वजन राखणे महत्त्वाचे आहे.7 / 10लठ्ठपणामुळे तुमची कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर लेव्हल खूप वाढते त्यामुळे हृदयविकाराचा धोका असतो. अशा परिस्थितीत तुमचे वजन निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी संतुलित आहार घ्या आणि शारीरिक क्रिया करत राहा.8 / 10धुम्रपानामुळे हृदयविकाराचा धोका खूप जास्त असतो. धुम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 2 ते 4 पट अधिक असतो, असा दावा अनेक अभ्यासांमध्ये करण्यात आला आहे. धूम्रपानामुळे हृदयापर्यंत ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते, रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि रक्त गोठण्याचा धोका वाढतो.9 / 10व्यायाम न केल्यामुळे आणि कोणत्याही शारीरिक हालचालींमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो. दररोज व्यायाम केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. 10 / 10शारीरिक हालचाली करूनही तुम्ही लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती मिळवू शकता. व्यायामामुळे शरीरातील रक्तदाबाची पातळीही कमी होते. अशा परिस्थितीत, असे मानले जाते की दररोज 75 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.