थंडीत 'हे' पदार्थ खा भरपूर; आरोग्याच्या समस्या राहतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 10:52 PM2019-12-16T22:52:42+5:302019-12-16T22:57:34+5:30

आवळा- व्हिटामिन सीचं प्रमाण अतिशय भरपूर असल्यानं आवळ्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. याशिवाय यकृत, त्वचा आणि केसांसाठीदेखील आवळा उपयुक्त ठरतो.

मध- थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी खोकल्याची समस्या जाणवते. त्यावेळी मध कामी येतं. शरीरातील उष्णता कायम ठेवून रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्याचं काम मध करतं.

बदाम- व्हिटामिन आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त बदाम थंडीत फायदेशीर ठरतात. दूध किंवा मधाच्या सोबत बदाम खाल्ल्यास थंडीपासून बचाव होतो.

संत्री- संत्र्यांमध्ये व्हिटामिन सीचं प्रमाण जास्त असतं. थंडीच्या दिवसांमध्ये पडणाऱ्या ऊनामुळे त्वचेचं नुकसान होतं. त्याची भरपाई संत्र्यांमधून होते.

आलं- अनेक औषधी गुण असलेल्या आल्यामध्ये खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याचा फायदा शरीराला थंडीच्या दिवसांमध्ये होतो.

लसूण- थंडीत शरीरातील रक्त प्रवाह अतिशय संथ होतो. तो सुरळीत ठेवण्यात लसूण महत्त्वाची भूमिका बजावते.

तुळस- थंडीच्या दिवसांमध्ये व्हायरल इंफेक्शनचा धोका असतो. त्यापासून तुळस शरीराचा बचाव करते. तुळशीमध्ये व्हिटामिस ए, व्हिटामिस सी, कॅल्शियम, झिंक आणि आयर्न असे महत्त्वाचे घटक असतात.