शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' कारणामुळे मोठ्यांसह लहान मुलांनाही उद्भवतोय अस्थमा; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2020 5:34 PM

1 / 8
तापमान कमी झाल्यामुळे दिल्लीसह भारताच्या अनेक राज्यांमध्ये वातावरणातील हवेत बदल झाला आहे. त्यामुळे हवा प्रदूषणात वाढ होत आहे. वयोवृद्ध, श्वसनाचे आजार असलेल्या लोकांनाच नाही तर लहान मुलांनाही या संकटांचा सामना करावा लागत आहे. ओन्ली माय हेल्थशी बोलताना मॅक्स सुपर स्पेशलिटी रुग्णालयातील ब्रोंकोलॉजी प्रमुख डॉ. नवीन किशोर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
2 / 8
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हवा प्रदूषण लहान मुलांसाठीही तितंकच जीवघेणं आहे. जितकं मोठ्या माणसांसाठी असते. यामुळे लहान मुलांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणं, निमोनिया, अस्थमा असे आजार उद्भवत आहेत. साधारणपणे प्रदूषणाचा स्तर वाढल्याने लहान मुलांची फुफ्फुसं आणि श्वसन प्रणालीला नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे स्किन इन्फेक्शन, डोळ्यांमध्ये खाज येणं, डोळ्यांची जळजळ होणं अशा समस्या उद्भवतात.
3 / 8
प्रदूषित हवेतील कणांमुळे अस्थमा होण्याची भीती असते. साधारणपणे हवेतील कण लहान मुलांच्या तोंडापासून फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. धूळ, धूर यातून शरीरात प्रवेश करणारे कण धोकादायक ठरू शकतात. यामुळे फुफ्फुसांमध्ये घाण जमा होऊन श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो.
4 / 8
भू-स्तरीय ओझोनमुळे मुलांच्या फुफ्फुसांना आणखी नुकसान होऊ शकते. जेव्हा कार, उर्जा संयंत्र आणि कारखान्यांमधील रसायने सूर्याच्या येणार्‍या किरणांमध्ये मिसळतात तेव्हा हे तयार होते. 'ओझोन प्रदूषण' हा धुक्याचा मुख्य भाग आहे. यामुळे, आजकाल आकाश तपकिरी-पिवळ्या रंगाच्या धुक्याने भरलेले दिसते. दम्याने ग्रस्त सुमारे 3.6 दशलक्ष मुलांना श्वास घेण्यास तसंच इतर क्रिया करताना त्रास होतो.
5 / 8
कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डाय ऑक्साईड, सल्फर नायट्रेट आणि नायट्रोजन ऑक्साईड वायू हवा प्रदूषित करण्यासाठी मुख्यतः आजारांसाठी कारणीभूत ठरतात. यामुळे एलर्जी, श्वास घ्यायला त्रास होणं, सुका खोकला असे आजार उद्भवतात.
6 / 8
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांना सकाळी आणि संख्याकाळच्यवेळी बाहेर जायला देऊ नका. कारण त्यावेळात प्रदूषणाचा स्तर जास्त असतो.
7 / 8
घरच्याघरी मुलांना व्यायाम करण्याची सवय लावा, डॉक्टरांकडून नेहमी चेकअप करून घ्या.
8 / 8
जास्त दिवस खोकला असेलतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या, अस्थमा असलेल्या लहान मुलांना धूळ, धुरापासून लांब ठेवा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाdoctorडॉक्टर