शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : कमी बुद्धीचे असतात कोरोना काळात मास्क न घालणारे लोक - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 9:51 AM

1 / 10
कोरोनापासून बचाव करण्यासाठी तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. एक म्हणजे मास्क लावणे, दुसरं सतत हात धुणे आणि तिसरं सोशल डिस्टंसिंग. पण जे लोक या गोष्टी पाळत नाहीत त्यांची बौद्धीक क्षमता कमी असते. म्हणजे ते कमी बुद्धीमान असतात. हा दावा आमचा नाही तर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या रिसर्चमधून करण्यात आला.
2 / 10
डेली मेलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी मास्क घालणे आणि सोशल डिस्ंटसिंगला नकार देणाऱ्यांची बुद्धी कमी असते. इतकेच नाही तर यातून हेही दिसतं की, या लोकांकडे चूक किंवा योग्यचा निर्णय घेण्याची मानसिक क्षमता नसते.
3 / 10
नियम न पाळल्याने त्या व्यक्तीच्या कामाची स्मरणशक्ती आणि मेंदूच्या काम करण्याची प्रक्रियेची माहिती मिळते. मेंदूच्या ज्या भागात हे सगळे निर्णय घेतले जातात तो कमजोर असतो.
4 / 10
यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या अभ्यासकांनी ८५० अमेरिकी नागरिकांवर सर्व्हे केला. यातून दिसून आलं की, ज्यांची बुद्धी चांगली आहे ते कोरोना व्हायरसशी निगडीत सर्व नियमांचे योग्य पद्धतीने पालन करत आहेत. म्हणजे हे लोक इंटेलिजंट आहे. जे लोक असं कररत नाहीत, त्यांची बौद्धीक क्षमता कमी आहे.
5 / 10
अभ्यासकांना या सर्व्हेतून समोर आलं की, जे लोक बुद्धीमान असतात ते वर्तमानातील सुरक्षा आणि भविष्याच्या फायद्यांबाबत विचार करतात. जर बौद्धीक रूपाने कमजोर लोक वर्तमानात जास्त बेजबाबदार असतात.
6 / 10
अभ्यासकांना आढळून आलं की, ज्या लोकांची बौद्धीक क्षमता आणि कामकाजी क्षमता जास्त होती ते कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करत होते.
7 / 10
कामासाठी उपयोगात आणला जाणारा मेंदू भाग तुम्हाला चूक किंवा बरोबर निर्णय घेण्यास मदत करतो. हाच भाग सांगतो की, तुमच्याकडे समजण्याची किती क्षमता आहे. जर तुम्ही फायद्यासाठी बनवलेले नियम समजू शकत नसाल तर याचा अर्थ हा होतो की, तुम्ही मेंदूचा योग्य वापर करत नाही आहात.
8 / 10
अभ्यासक वायवाय जॅंग म्हणाले की, ज्यांच्याकडे कामात उपयोगात आणली जाणारी बौद्धीक क्षमता जास्त असेल तर तुम्ही नियमांचं योग्य प्रकारे पालन कराल. ज्यांच्याकडे ही क्षमता नाही ते कोरोनाशी संबंधित नियमांची सतत खिल्ली उडवत आहेत.
9 / 10
जॅंग म्हणाले की, जगभरातील देशांमधील सरकारांनी आता कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि बचावाच्या उपायांबाबत अशी जागरूकता केली पाहिजे, ज्याने कमी बुद्धी असलेल्या लोकांनाही ते समजतील. जेणेकरून ते त्या नियमांचं पालन करतील.
10 / 10
वायवाय जॅंग म्हणाले की, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांना सवय बनवण्यात लोकांना अजून थोडा वेळ लागेल. कारण या नियमांचं पालन करण्यासाठी लोकांना रोजच्या जगण्यातील सवयी आणि तात्कालिक बुद्धी यांच्यात संघर्ष करावा लागतो आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यResearchसंशोधन