Coronavirus : वर्क फ्रॉम होम करताय?, मग अशी घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:23 IST
1 / 12कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. घरी बसून काम करताना कशी काळजी घ्यायची जाणून घ्या.2 / 12वर्क फ्रॉम होममध्ये एकाच जागी बसून 8 ते 10 तास काम करावं लागत आहे. अशा वेळी शरीर किंवा पाठ दुखण्याची दाट शक्यता असते.3 / 12काम करताना बसण्यासाठी योग्य जागेची निवड करावी. साधारण ऑफिसमध्ये बसतो तसं खुर्चीवर बसून काम करा पाय जमिनीला टेकवून बसणं महत्त्वाचं आहे. आरामात बसून काम करा. 4 / 12बेडवर बसून काम करत असाल तर पाठीमागे सपोर्ट घेणं गरजेचं आहे. बसताना पाठीमागे उशी घ्या.5 / 12खाली मान घालून काम केल्यास मान दुखण्याची शक्यता दाट असते तसेच डोळेही दुखू शकतात त्यामुळे स्क्रिन आणि डोळ्यांची लेवल एक ठेवा. 6 / 12लॅपटॉपवर काम करताना हाताची पोझिशन नीट ठेवा. म्हणजे काम करायला सोपे जाईल आणि हातही दुखणार नाही. 7 / 12काम करताना अनेकदा ऑफिसमधील कर्मचाऱ्यांशी फोनवर बोलावं लागत त्यावेळी फोन नीट कानाला लावून बोला किंवा हेडफोन्सचा वापर करा. 8 / 12काम करताना खूप तास एकाच वेळी बसू नका. यामुळे अंग दुखू शकतं त्यामुळे मधेच पाय मोकळे करायला थोड चाला.9 / 12अनेकदा काम करताना लॅपटॉप मांडीवर ठेवला जातो. मात्र असं बसून काम करू नका. लॅपटॉप टेबलवर ठेवा किंवा मांडीवर घेण्याऐवजी त्याखाली उशी घ्या. 10 / 12काम करण्याची जागा निश्चित करा म्हणजे काम करायलाही उत्साह वाटेल. काम करताना जास्त ताण येणार नाही.11 / 12सतत लॅपटॉप अथवा फोनच्या स्क्रिनवर बघून डोळ्यांवर ताण येतो. डोळे दुखू लागतात त्यामुळे काम करताना डोळ्यांची विशेष काळजी घ्या. 12 / 12ऑफिसमध्ये काम करताना टी ब्रेक, लंच ब्रेक असतो. वर्क फ्रॉम होम करताना ही छोटा ब्रेक घ्या म्हणजे काम करताना कंटाळा येणार नाही. तसेच पोषक आहार घ्या.