शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : ...आता सर्दी झाली तरी नो टेन्शन! कोरोना संसर्गापासून मिळू शकतं संरक्षण; रिसर्चमध्ये मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 2:28 PM

1 / 12
वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा जगभरात हाहाकार पाहायला मिळत आहे. लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 30 कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 12
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने देखील चिंता वाढवली आहे.
3 / 12
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,063 नवे रुग्ण आढळले असून 277 जणांचा मृत्यू झाला आहे. ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 4,461 वर गेली आहे.
4 / 12
कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरत आहे. याची लक्षणं सुद्धा खूप सामान्य आहेत. यात रुग्णाला सुरुवातील सर्दी, खोकला, ताप येतो पुढील काही दिवसात श्वास घ्यायलाही त्रास होत असल्याचं याआधी समोर आलं आहे.
5 / 12
ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, फ्लू या शारीरिक समस्यांची लक्षणं आणि कोरोना व्हायरसची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात. मात्र आता याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
6 / 12
सर्दी झाली तरी आता घाबरण्याचं अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्दीमुळे कोरोनापासून सुरक्षित राहता येतं अशी माहिती आता समोर आली आहे. कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळू शकतं असा मोठा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे.
7 / 12
सर्दीला प्रतिकार करण्यासाठी शरीरामध्ये निर्माण होणारे टी सेल्स हे कोरोना संसर्गचा धोका कमी करतात. सामान्यपणे सर्दीचा त्रास असणाऱ्यांना सार्क-सीओव्ही 2 चा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते, असं ब्रिटनमधील एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे.
8 / 12
नेचर कम्युनिकेशन्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, टी सेल्समुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्तीचा पुरावा पहिल्यांदाच मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे.
9 / 12
लंडनमधील इम्पिरियल कॉलेजच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये कोरोना व्हायरस टाइप संसर्गामुळे निर्माण झालेल्या टी सेल्समुळे घातक ठरणाऱ्या कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी कारणीभूत असलेल्या सीर्स-सीओव्ही-2 या व्हायरसला प्रतिरोध करण्याची क्षमता निर्माण होते.
10 / 12
संशोधकांचं असं म्हणणं आहे की सामान्य सर्दीसाठी कारणीभूत असणाऱ्या व्हायरसमुळे शरीरामध्ये निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती ही कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत करू शकते. याचा फायदा पुढे कोरोना प्रतिबंधक लसींच्या निर्मितीसाठी होईल असा विश्वास संशोधकांना आहे.
11 / 12
लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमधील नॅशनल इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ रिसर्चचे निर्देशक प्राध्यापक अजित लालवानी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. जगभरात कोरोनावर रिसर्च करण्यात येत आहे.
12 / 12
'सामान्य सर्दीसाठी कारणीभूत असणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे निर्माण होणारे टी सेल्स हे सार्स-सीओव्ही-2 चा संसर्गापासून संरक्षण देतात याचे पुरावे सापडलेत' असं लालवानी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनResearchसंशोधन