CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! कोरोनाच्या चौथ्या लाटेत दातांना मोठा धोका, 'या' 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 11:54 IST
1 / 17कोरोनाच्या तिसर्या लाटेनंतर असं वाटत होते की, ही महामारी आता संपली आहे, परंतु कोरोना व्हायरस पुन्हा एकदा हळूहळू आपले पाय पसरत आहे. युरोप आणि आशियातील देशांमध्ये प्रकरणे वाढत आहेत. 2 / 17शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे की कोरोनाची चौथी लाट लवकरच इतर प्रमुख देशांमध्ये येऊ शकते, ज्यासाठी प्रामुख्याने ओमायक्रॉनचा सबव्हेरिएंट BA.2 (Omicron BA.2) जबाबदार आहे.3 / 17भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,335 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 52 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे देशभरात तब्बल 5,21,181 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 4 / 17कोरोना व्हायरस हा प्रामुख्याने श्वसनाचा आजार आहे. जो फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. खूप ताप, खोकला आणि घसा खवखवणे ही प्रमुख लक्षणं आहेत, परंतु आता हा व्हायरस शरीराच्या इतर भागांमध्ये कहर करत आहे. 5 / 17कोरोनाबाबत आता नवनवीन माहिती ही संशोधनातून समोर येत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेत दातांना मोठा धोका निर्माण झाला आहे. फुफ्फुस, पोट यानंतर आता कोरोना दातांवर अटॅक करत असल्याचं समोर आलं आहे.6 / 17कोरोनामुळे दात आणि हिरड्यांचेही नुकसान होत आहे, ज्याची लक्षणे दिसू लागली आहेत, त्याला 'कोविड टीथ' असं नाव दिलं जात आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेपूर्वी ही लक्षणे समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे7 / 17एका संशोधनात असं आढळून आले आहे की कोरोना व्हायरसची लक्षणं आणि दाताचं आरोग्य यांच्यात संबंध आहे. शास्त्रज्ञांच्या मते कोविड-19 मुळे दातांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कोरोनाग्रस्त 75 टक्के रुग्णांमध्ये दातांच्या समस्या आढळून आल्या आहेत.8 / 17कोरोना व्हायरसच्या लक्षणांवर केलेल्या 54 स्टडीच्या रिपोर्टमध्ये या गंभीर आजाराच्या शीर्ष 12 लक्षणांमध्ये तोंडाशी संबंधित कोणतीही लक्षणं नसल्याचं समोर आलं आहे. यापैकी, ताप (81.2 टक्के), खोकला (58.5 टक्के) आणि थकवा (38.5 टक्के) ही सर्वात सामान्य लक्षणे होती.9 / 17कोरोना व्हायरसची काही लक्षणं तोंडामध्ये तेव्हा दिसून येतात जेव्हा व्हायरसचा परिणाम हा डेंटल हेल्थवर होतो. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा योग्य तो सल्ला घ्या. 10 / 17हिरड्यांमध्ये वेदना, जबडा किंवा दात दुखणे, हिरड्यांमध्ये रक्त जमा होणं, ताप, खोकला, थकवा ही सहा लक्षणं दिसल्याचं वेळीच सावध व्हा. दात किंवा हिरड्याचे दुखणे कोणालाही त्रास देऊ शकते, परिस्थितीत वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 17ज्या वेगाने कोरोना आता आपलं रूप बदलत आहे, त्याप्रमाणे या व्हायरसची लक्षणेही बदलत आहेत. त्यामुळे या नव्या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबतही वैद्यकीय तज्ञांकडून नवनवीन दावे केले जात आहेत.12 / 17पोटाशी संबंधित विविध लक्षणे दिसून येत असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार कॅलिफोर्नियाच्या 'सेंटर फॉर फंक्शनल मेडिसिन'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुंज्या श्वेग यांनी व्हायरसच्या लक्षणांबाबत भाष्य केलं आहे.13 / 17कोरोना विषाणूची लक्षणे ही प्रत्येक रुग्णानुसार वेगळी असल्याचं याआधी अनेकदा दिसून आलं आहे. या विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून बहुतांश रुग्णांमध्ये ताप आणि अशक्तपणा ही लक्षणे दिसून आली आहेत.14 / 17डॉ. सुंज्या श्वेग यांच्या म्हणण्यानुसार, बाधित रुग्णाला तापानंतर सर्दीसह खोकल्याचा त्रास सुरू होऊ शकतो. त्यानंतर खोकल्यामुळे गळ्याला सूज येऊ शकते आणि डोकेदुखीही वाढण्याची शक्यता निर्माण होते.15 / 17स्नायूंमध्ये वेदना होणे हे कोरोनाचं सर्वसाधारण लक्षण आहे. या आजारात स्नायूच्या वेदना हळूहळू वाढून नंतर गंभीर रूप धारण करू शकतात. स्नायूच्या वेदना या काही दिवस राहू शकतात. तर कधी कधी या जास्त वेळ देखील असू शकतात. विशेषत: लाँग कोविड असलेल्या लोकांना याचा जास्त त्रास होत असतो.16 / 17पॉझिटिव्ह व्यक्तीला उलटीचा त्रास सुरू होऊ शकतो. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील आकडेवारीनुसार ओमायक्रॉनबाधित रुग्णांना उलटीचा त्रास सर्वाधिक जाणवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.17 / 17श्वास घेण्यास त्रास होणे, लो ऑक्सिजन सॅच्युरेशन, सतत होणारी डोकेदुखी, ओठ आणि नखं पिवळी किंवा निळी होणं, उलटी असा त्रास जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.