शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 1:57 PM

1 / 10
कोरोना व्हायरसबद्दल लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनामुळे वाढत असलेल्या मृतांचा लक्षात घेता जो तो व्यक्ती आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. या आजारावर आत्तापर्यंत कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. लोक आपापल्या पद्धतीने या आजाराला रोखण्याासाठी खबरदारीचे उपाय घेताना दिसून येत आहेत.
2 / 10
कोरोनाबद्दल अनेक अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. सध्या कोरोना व्हायरस हा गरम पाण्याची वाफ घेतल्याने किंवा गरम पाणी प्यायल्याने बरा होतो. असा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरस होत आहे. आज आम्ही तुम्हाला या गोष्टीत किती तथ्य आहे. याबाबत सांगणार आहोत.
3 / 10
सध्या मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्यासोबत लोक स्टिम थेरेपी सुद्धा करत आहेत. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की जास्त हिट निर्माण झाल्यामुळे कोरोना जिवंत राहू शकणार नाही.
4 / 10
१५ ते २० मिनिटांपर्यंत किंवा जितका जास्तवेळ तुम्ही वाफ घेऊ शकता तितका जास्त वेळ घ्या. त्यामुळे CDC आणि WHO ने या गोष्टीचे सर्मथन केले आहे. की स्टीम थेरेपी व्हायरसचा उपाचार असू शकते.
5 / 10
कोरोना व्हायरस हा अधिक तापमानात जिवंत राहू शकत नाही, हे लक्षात घेऊन लोक अधिकाधिक वेळ वाफ घेत आहेत.
6 / 10
दिवसातून दोन ते तीन वेळा वाफ घेणं ठिक आहे पण त्यापेक्षा अधिकवेळ वाफ घेतल्यामुळे फुप्फुसांवर वाईट परिणाम होऊ शकतो. फुप्फुस आकुंचन पावतात.
7 / 10
जास्त तापमानात जर तुम्ही श्वास घेतल्यामुळे अनेकदा त्वचा कोरडी सुद्धा पडू शकते. त्यामुळे त्वचेच्या आतिल टिश्यू बर्न होतात. ज्यामुळे गळ्यात सूज येते त्यामुळे श्वास घेण्याासाठी त्रास होतो.
8 / 10
वाफ घेण्यासह गरम पाणी जास्तीत जास्त पिण्याचा पर्याय सुद्धा अनेक लोक निवडत आहेत.
9 / 10
डॉक्टर सर्वसाधारणपणे सर्दी, खोकला झाल्यानंतर वाफ घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे स्टिम नाक आणि गळ्यातील म्युकसला पातळ बनवते. परिणामी श्वास घ्यायला समस्या उद्भवत नाही.
10 / 10
पाण्याची वाफ घेण्यासोबतच अनेर लोक विक्स किंवा संत्र, लिंबाचं साल, लसूण. टी-ट्री ऑईल, आलं, कडुलिंबाची पानं, यांसारख्या पदार्थांचा वापर करून हेल्दी राहण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण हे हर्ब्स ऐंटिमाइक्रोबियल आहेत. त्यामुळे लोकांना असं वाटतं की व्हायरसला मारून टाकण्यासाठी प्रभावशाली आहेत.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस