शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना अलर्ट : भाज्या, फळं आणि फ्रोजन फूड्सना थेट हात का लावू नये? रिसर्चमधून खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 1:04 PM

1 / 11
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काही गाइडलाईन्स सांगण्यात आल्या आहेत. अनेकजण त्या फॉलोही करत आहेत. अशात एका रिसर्चमधून आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर्मनीमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनंतर अलर्ट जारी केला आहे की, आपण कोणत्या वस्तूंना थेट हात लावणं टाळलं पाहिजे.
2 / 11
या अलर्टमध्ये काही वस्तूंना हात लावताना सावधान राहण्यास सांगण्यात आलं आहे. ज्याच फळं आणि भाज्यांचाही समावेश आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभाव या वस्तूंना किंवा पदार्थांना स्पर्श करताना सावधान राहिलं पाहिजे. त्यांना थेट स्पर्श करू नये.
3 / 11
जर्नल फेडरल इन्स्टिट्यूट फॉर रिस्क एसेसमेंटने आपल्या रिसर्चमध्ये सांगितले आहे की, फळं आणि भाज्यांना थेट स्पर्श करणं घातक आहे. कारण कोरोनाचं संक्रमण या माध्यमातूनही होऊ शकतं. बाजारात येण्याआधी आणि दुकानात ठेवल्यानंतर अनेक लोकांना याला स्पर्श केलेला असतो.
4 / 11
असंही होऊ शकतं की, याला कोरोना व्हायरसने संक्रमित व्यक्तीने स्पर्श केला असावा. इन्स्टिट्यूटने सांगितले की, फळं-भाज्यांना स्पर्श केल्यावर हात लगेच स्वच्छ धुवावे किंवा हातात काही घालून त्यांना स्पर्श करा.
5 / 11
तसेच भाज्या किंवा फळं शिजवण्याआधी चांगल्या स्वच्छ कराव्या. तज्ज्ञांनी सांगितले की, एक शिजवल्यावर भाज्यांपासून काही धोका नाही.
6 / 11
त्याचप्रमाणे पॅकेट बंद किंवा डबा बंद फ्रोजन फूड्सच्या डब्यांनाही कुणीही हात लावलेले असतात. हे तुम्ही गरम कराल तर कोरोना व्हायरस नष्ट होईल. पण फ्रोजन फूडच्या डब्याला किती लोकांनी हात लावला हे तुम्हाला माहीत नसतं.
7 / 11
तज्ज्ञांनी सांगितले की, फ्रोजन फूड मायनस तापमानावर ठेवलं जातं आणि या तापमानात कोरोना व्हायरसचं संक्रमण साधारण 2 वर्षांपर्यंत टिकून राहू शकतं. अशात जर्मन इन्स्टिट्यूटचं म्हणणं आहे की, पॅकेटच्या बाहेरील आवरणावर व्हायरस असू शकतो. पण पॅकेटच्या आत जाऊ शकत नाही.
8 / 11
त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या कॅन्टीन, हॉटेल आणि ठेल्यावर खात असाल तर त्यांची भांडीही कोरोनाने संक्रमित असू शकते. त्यामुळे बाहेर खाणं टाळा.
9 / 11
अभ्यासकांनी सांगितले की, जर ग्लव्स घालून क्रॉकरी किंवा भांडी स्वच्छ केली जात नसेल तर महागात पडू शकतं. कारण या भाड्यांना कुणीतरी हात लावलेला असतो. पण अशाप्रकारे संक्रमण झालेली एकही केस अजून समोर आली नाही असंही त्यांनी सांगितलं.
10 / 11
जर तुम्ही लिफ्टमध्ये असाल किंवा ऑफिस किंवा सार्वजनिक स्थानावर एखाद्या दरवाजाच्या हॅन्डलवर हात लावत असाल तर त्यासाठी कापड किंवा टिश्यू पेपरचा वापर करा. याने संक्रमणाचा धोका टळेल. तसेच कुठे हात लावलाच तर हात लगेच साबणाने चांगले स्वच्छ करा.
11 / 11
अमेरिकेतील रॉकी माउंटेन लेबॉरेटरीजकडून एक नवीन रिसर्च करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना व्हायरस स्टेनलेस स्टीलवर 72 तास आणि प्लास्टिक किंवा कार्डबोर्डवर 24 तास राहू शकतो. पण त्याचं जिवंत राहणं तापमान किंवा ओलावा यावर अवलंबून राहतं.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स