शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हादरवणारी बातमी! दक्षिण आफ्रिकेच्या धोकादायक कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव; अधिक सर्तक राहावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 7:46 PM

1 / 9
भारतात ब्रिटनमधील कोरोना व्हायरसनंतर आता दक्षिण आफ्रिकेतील नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाला आहे. या नव्या स्ट्रेनची ५ प्रकरणं सध्या समोर आलं आहे. या प्रकरणात सगळ्यांनाच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या पाच जणांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीदेखील चाचणी करण्यात आली आहे.
2 / 9
कोरोना व्हायरसमध्ये ब्रिटनच्या स्ट्रेननंतर आता दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलचा स्ट्रेन समोर आला आहे. आसयीएमआरचे प्रमुख तज्ज्ञ बलराम भार्गव यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सार्स कोव-२ च्या ब्राझिलमधील स्ट्रेनबाबत माहिती मिळाली असल्याचे सांगितले आहे.
3 / 9
लसीच्या परिणामकतेचा अभ्यास करण्यासाठी सध्या तज्ज्ञांचे परिक्षण सुरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलचा वेरिएंट ब्रिटनच्या स्ट्रेनपेक्षा वेगळा आहे.
4 / 9
आयसीएमआरकडून समोर आलेल्या माहितीनमुसार ब्रिटनमधील स्ट्रेनचे आतापर्यंत १८७ रुग्ण समोर आले आहेत. ब्रिटनच्या नव्या स्ट्रेननं संक्रमित असलेल्यांपैकी एकालाही मृत्यूचा सामना करावा लागलेला नाही.
5 / 9
सगळ्या पॉझिटीव्ह रुग्णांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. अनेक लस कंपन्यांनी दावा केला आहे की, त्यांच्या कंपनीची लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला नष्ट करण्यासाठी परिणामकारक ठरू शकते.
6 / 9
आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, ''ब्रिटनहून आलेल्या नागरिकांना आरटी पीसीआर चाचणी करणं अनिवार्य आहे. जे लोक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचे जीनोम सिक्वेन्स अनुक्रमण केलं जात आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलच्या विमान उड्डानंसाठी या नियोजनाचा अवलंब केला जात आहे.''
7 / 9
४४ देशामध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्ट्रेन पसरल्याचं सांगितलं जात आहे.
8 / 9
दरम्यान संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक आहे. सोमवारी देशात ९ हजार ९३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या दोन सोमवारची यासोबत तुलना केल्यास संख्येत मोठी वाढ झाली आहे.
9 / 9
सोमवारी रूग्णसंख्या कमी येण्याचं कारण म्हणजे वीकेंडमुळे स्टाफ कमी असल्यानं चाचण्याही कमी झाल्या होत्या. सोमवारी ४.९ लाखापेक्षाही कमी चाचण्या झाल्या. ६ महिन्यात इतक्या कमी चाचण्या होण्याची ही पहिलीच वेळ होती. सोमवारी देशात ८२ रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर आतापर्यंत मृतांचा आकडा १ लाख ५५ हजार ८४४ च्या पार गेला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसSouth Africaद. आफ्रिका