शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : कोरोनावर मात केलेल्यांसाठी लशीचा एकच डोस पुरेसा; BHUच्या वैज्ञानिकांचा मोठा दावा, PM मोदींना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 5:42 PM

1 / 10
देशात कोरोना लशीचा तुटवडा (Corona Vaccine) जाणवत असतानाच बीएचयूच्या वैज्ञानिकांनी पीएम मोदींना एक मोठा सल्ला दिला आहे. यात, ज्या लोकांनी कोरोनावर मात केली आहे, अशांसाठी लशीचा केवळ एक डोसच अनिवार्य करण्यात यावा. कारण ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांच्यासाठी लशीचा एक डोसच पुरेसा आहे, असा दावा या वैज्ञानिकांनी केला आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात बीएचयूच्या वैज्ञानिकांनी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिले आहे (BHU Scientist Letter to PM).
2 / 10
वैज्ञानिकांनी म्हटले आहे, आतापर्यंत दोन कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे. अशा लोकांना लशीचा एकच डोस दिला गेला, तर देशात लशीचा जो तुडवडा जाणवत आहे, तो संपेल. तसेच अधिकांश लोकांना वेळेवर कोरोना लस मिळेल.
3 / 10
यासंदर्भात बीएचयूच्या वैज्ञानिकांनी दोन महिने कोरोनाचा अभ्यास केला. यात, एकदा संक्रमित झालेल्या व्यक्तींना लशीचा एक डोसच पुरेसा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
4 / 10
10 दिवसांतच तयार होते आवश्यक अँटीबॉडी - संशोधक म्हणाले, अशा लोकांत लशीचा पहिला डोस दिल्यानंतर 10 दिवसांच्या आतच पुरेशी अँटीबॉडी तयार होते. ही अँटीबॉडीकोरोनाचा सामना करण्यात अत्यंत उपयुक्त ठरते.
5 / 10
वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की ज्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होण्यासाठी जवळपास 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागतो.
6 / 10
बीएचयूतील 6 वैज्ञानिकांनी कोरोनावर अभ्यास केला आहे. 20 लोकांवर यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. यामुळेच या वैज्ञानिकांनी, कोरोना संक्रमित व्यक्तींसाठी केवळ एकच डोस अनिवार्य करण्यात यावा, असा सल्ला पंतप्रधान मोदींना दिला आहे.
7 / 10
या वैज्ञानिकांनी 12 मेरोजी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्या रिझल्टसंदर्भात माहिती दिली होती.
8 / 10
या अभ्यासात झूलॉजी विभागाचे प्रा. ज्ञानेश्वर चौबे, न्यूरोलॉजी विभागातील प्रा. विजय नाथ मिश्र, प्रा. अभिषेक पाठक, डॉ. प्रणव गुप्ता, डॉ. प्रज्ज्वल प्रताप सिंह, डॉ. अन्शिता श्रीवास्तव यांचा समावेश होता.
9 / 10
नॅचरल अँटीबॉडीच्या रिझल्टवर संशोधन सुरू - बीएचयूमधील झूलॉजी विभागातील प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी सांगितले, की यावर आणखी संसोधन सुरू आहे. व्हायरस सातत्याने आपले रूप बदलत असल्याने त्याच्या विरोधात नॅचरल अँटीबॉडीच्या रिझल्ट्सवर नियमित संशोधन सुरूच राहील. संशोधनानंतर जे रिझल्ट समोर येतील, ते देशासमोरही ठेवण्यात येतील.
10 / 10
कोरोनावर मात केलेल्यांसाठी लशीचा एकच डोस पुरेसा; BHUच्या वैज्ञानिकांचा मोठा दावा...
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदीBHUबनारस हिंदू विश्वविद्यालयProfessorप्राध्यापकmedicineऔषधं