आता चीननंही दिली 'सिंगल डोस' कोरोना लशीला मंजुरी, जॉन्सन अँड जॉन्सनला टक्कर देण्याचा प्रयत्न

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 28, 2021 10:58 PM2021-02-28T22:58:51+5:302021-02-28T23:15:02+5:30

या वृत्तात, चायना (China) सेंट्रल टेलीव्हिजनने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा हवाला देत सांगण्यात आले आहे, की चीनने सशर्त मंजुरी दिलेली ही पहिली कोरोनाची 'सिंगल डोस' लस आहे. (China also approves one dose Covid-19 vaccine attempts to challenge Johnson Johnson)

अमेरिकेपाठोपाठ चीननेही 'सिंगल डोस' कोरोना लशीला सशर्त मंजुरी दिली आहे. चीनची ही लस म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीची प्रतिस्पर्धक मानली जात आहे.

यूएस ड्रग रेग्युलेटरने शनिवारी कोरोनापासून बचावासाठी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या 'सिंगल डोस' लशीला परवानगी दिली.

यानंतर चीनचे सरकारी वृत्त पत्र ग्लोबल टाइम्सने रविवारी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी चीनने पहिली ‘अॅड5-एन कोवी’ लस उपलब्ध करून दिली आहे.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी 16 मार्चला या लशीच्या पहिल्या टप्प्यावरील परीक्षणाला सुरूवात झाली होती. यानुसार, क्लीनिकल परीक्षण झालेली हीच जगातील कोविड-19 ची, अशी पहिली लस होती.

या वृत्तात, चायना सेंट्रल टेलीव्हिजनने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा हवाला देत सांगण्यात आले आहे, की चीनने सशर्त मंजुरी दिलेली ही पहिली कोरोनाची 'सिंगल डोस' लस आहे.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या लशीचा प्रभाव किमान सहा महिन्यांपर्यंत राहू शकतो.

महत्वाचे म्हणजे सहा महिन्यानंतर या लशीचा दुसरा डोस घेतल्यास, प्रतिकार शक्ती 10 ते 20 टक्क्यांनी वाढते.