सावधान! मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसत असतील तर वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:41 IST
1 / 8लहान मुलांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. सध्या मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येत आहे. 2 / 8लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.3 / 8लहान मुलांची पचन क्षमता जास्त असते. त्यामुळे त्यांना जास्त भूक लागते. मात्र हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास भूक लागत नाही.4 / 8मुलांना जास्त सुस्ती येत असेल तसेच कोणतेही काम न करता किंवा न खेळता हे थकून जात असतील तर हिमोग्लोबिनची कमतरता असते. 5 / 8शरिरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर त्वचा पिवळी होते. त्यामुळे लहान मुलांच्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करा. 6 / 8अनेकदा लहान मुलं छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडतात. त्यामुळे त्यांची नीट काळजी घ्या. 7 / 8हिमोग्लोबिनची कमी असल्यास लहान मुलांची उंची आणि वजन वाढत नाही.8 / 8लहान मुलांना मिनरल्स आणि व्हिटॅमिनयुक्त आहार दिल्यास ही हिमोग्लोबिनची कमतरता दूर करता येते. (टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)