बोरांचे गुणकारी उपयोग तुम्हाला माहितीयेत का? 'या' आजारांवर ठरते फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 16:59 IST
1 / 6चवीला आंबट,गोड असणारे बोर हे फळ अनेक व्याधींच्या समस्येवर गुणकारी आहे.बोरांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम आढळते.त्यामुळे बोराचे सेवन केल्यास हाडे मजबुत होतात.2 / 6सध्या संगणकावर तासनतास काम केल्याने डोळे दुखण्याच्या समस्या उद्भवतात.या समस्येपासुन सुटका मिळवण्यासाठी बोरांच्या सालीची पेस्ट करून ती डोळ्यांना लावल्यास त्वरित आराम मिळतो.3 / 6या छोट्या बोरांची मोठी कमाल म्हणजे कॅंसरसारख्या रोगाशी लढण्याचा गुण या फळामध्ये आहे.शरीरात कॅसरच्या जंतुंचा प्रसार कमी करण्यात हे फळ महत्वाची भूमिका बजावते.4 / 6रानमेवा म्हणुन ओळख असलेल्या बोरांचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.त्यामुळे थंडीमध्ये बोरं खाणे उत्तम मानले जाते.5 / 6अँटी ऑक्ससिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले हे फळामुळे केस तसेच त्वचेच्या संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.या फळामध्ये कॅलरिजचे प्रमाण कमी असते आणि शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा देते.6 / 6आरोग्याच्या विविध तक्रारींवर या फळाचा अतिशय चांगला उपयोग होत असून हा रानमेवा फायदेशीर असतो.शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम बोर हे फळ करते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी या फळाचे सेवन आवर्जून केले पाहिजे.