शाकाहाराचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्, घासपूस म्हणत नाक मुरडणं कायमचं बंद कराल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 17:06 IST
1 / 10अनेक संशोधनांतून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की आपल्या आहारातील भाज्यांमुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात. शाकाहारात फायबर आणि अॅंटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असल्यानं ते आपल्याला फायदेशीर ठरतं.2 / 10त्याचबरोबर आपल्याला शाकाहारातून पोटॅशियम, मॅग्नीशियम फोलेट, आयरन आणि व्हिटॅमिन ए, सी आणि ई (Vitamin A, C and E) सारखे पोषकतत्वं मिळतात.3 / 10वजन कमी करायचं असेल (Obesity)तर आपल्यासाठी शाकाहार हा उत्तम पर्याय आहे. कारण मांसाहार करणाऱ्यांच्या तुलनेत शाकाहार करणाऱ्यांमध्ये बॉडी मास इंडेक्स (BMI index) कमी असतो.4 / 10त्याचबरोबर शाकाहारामुळं शरीराला योग्य प्रमाणात कॅलरीज मिळतात. त्यामुळं आपल्याला लठ्ठपणाचा धोका टाळता येतो.5 / 10शाकाहारामुळे आपल्या शरीरातील रक्तदाबाचीही समस्या कमी होऊ शकते. बीपीने ग्रस्त असणाऱ्यांनाही शाकाहाराचा फायदा होऊ शकतो.6 / 10भाज्या-फळांमुळे आपल्या शरीरातील किडनी फंक्शनमध्ये सुधारणा होत असते.7 / 10शाकाहारामुळे कॅन्सरपासूनही बचाव करता येतो कारण शाकाहारी व्यक्तींच्या शरीरात कोलोरेक्टल कॅन्सरचा (colon cancer) धोका कमी होत असतो.8 / 10ताजी फळं आणि पालेभाज्यांमुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. शाकाहारामुळे आपल्याला हार्ट अटॅकचाही धोका कमी होत असतो. एका संशोधनानुसार शाकाहाराचे सेवन करणाऱ्या ७५ टक्के लोकांना हार्ट अटॅकचा धोका कमी होत असतो.9 / 10शाकाहारी पदार्थांमधील दूध, लोणी, चीझ, शेंगदाणे, सोयाबीन, पालेभाज्या, पनीर, टोफू यांच्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी शरीराला मोठी मदत मिळते.10 / 10तुम्हाला शाकाहारामध्येच मांसाहारासारखी चव अनुभवण्यास मिळाली तर? यासाठी मशरूम आणि फणसाची भाजी खाऊन पाहा. या भाज्यांना मांसाहाराप्रमाणे चव येते, असं म्हणतात. पोषण तत्त्वांचा साठा असलेल्या या दोन्ही भाज्या चविष्टही आहेत.