रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिण्याचे लाभदायी फायदे! जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 20:30 IST
1 / 6मेथीचे पाणी शरीरासाठी फायदेशीर असते. रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया, शुगर, वजन कमी करणे, यासह अनेक फायदे होतात. जाणून घ्या, रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिण्याचे फायदे... 2 / 6मेथीचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. मेथीच्या पाण्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या मेथीचे पाणी प्यायला हवे.3 / 6मेथीच्या प्यायल्याने शुगर नियंत्रित राहते. यात फायबर आढळते, जे रक्तामध्ये हळूहळू ग्लुकोज सोडते. परिणामी, साखरेची पातळी अचानक वाढत नाही.4 / 6वजन कमी करायचं असेल तर मेथीचं पाणी प्यायला हवे. यात फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे भूक कमी लागते आणि पोट दिर्घकाळ भरलेलं राहतं.5 / 6मेथीचे पाणी हे पिरीएड्मध्ये फार उपयोगी ठरते. मेथीच्या पाण्याने पोटदुखीपासून आराम मिळतो तसेच हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.6 / 6मेथीचे पाणी कोलेस्ट्रॉल कमी करते. कोलेस्टेरॅाल कमी झाल्याने हृदयाची समस्या कमी होते.