शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काळजी वाढली! २ वर्षांपर्यंत कोरोना पाठ सोडणार नाही; WHO तज्ज्ञांनी दिला 'या' ३ गोष्टींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 1:45 PM

1 / 8
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ सौम्या स्वामीनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची माहामारी आता लवकर आटोक्यात येणार नाही. दक्षिण भारतातील वाणिज्य आणि उद्योग मंडळद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका चर्चेत स्वामीनााथन यांनी सांगितले की, पूर्वीप्रमाणे पुन्हा व्यावहारीक जीवन सुरू करण्यासाठी आता २ वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. जोपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मानसिकदृष्या सबळ राहायला हवं.
2 / 8
पुढच्या वर्षांच्या मध्यापर्यंत कोरोनाची लस तयार होऊ शकते. पण सुरूवातीला लसीचे वितरण मर्यादित स्वरूपात असेल. जास्त धोका असलेल्या कामगारांना, वयस्कर लोकांना, फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनाची लस सगळ्यात आधी दिली जाणार आहे. संपूर्ण लोखसंख्येचे लसीकरण करण्यासाठी कमीतकमी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो.
3 / 8
व्हायरसचा प्रसार पसरवत असलेल्या समुहांवर जोर देत स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा प्रसार नियंत्रण मिळवलेल्या देशांनतर ज्या देशांमध्ये वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. त्या देशांवरही लक्ष द्यायला हवं. तेव्हाच कम्यूनिटी ट्रांसमिशनचा धोका टाळता येऊ शकतो.
4 / 8
पुढे त्यांनी सांगितले की, कोरोनाचा सामना करण्यासाठी तीन गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. अनव्हेंटिलेटेडेड म्हणजचे हवा खेळती नसेल अशा ठिकाणी जाऊ नका किंवा अशा ठिकाणांचा वापर करणं टाळा.
5 / 8
गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करा. या तीन उपयांचा वापर केल्यास कोरोनाला रोखता येऊ शकते. जपानमध्येही या पद्धतींचा वापर करून कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे.
6 / 8
त्यांच्यामते कम्यूनिटी ट्रांसमिशनसाठी कारणीभूत ठरत असलेल्या लोकांची ओळख करून त्यांना इन्फेक्शन पसरवण्यापासून रोखण्यासाठी वेगळे ठेवायला हवं. चांगल्या भविष्यासाठी सरकारसह नागरिकांनीही जबाबदारी घ्यायला हवी.
7 / 8
जागतिक स्तरावर या व्हायरसने थैमान घातलं असून गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण जगभरात तीन लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. तर मृतांचा आकडा ११ लाखांच्यावर गेला आहे.
8 / 8
रोज जवळपास ६ हजारापेक्षा जास्त लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू होत आहे. जगभरातील १० टक्के लोकसंख्या सध्या कोरोना संक्रमणाचा सामना करत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीयWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना