शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सकाळी पाणी रिकाम्या पोटी प्यावं की काही खाऊन? जाणून घ्या पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:40 PM

1 / 9
आपलं शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यात पाणी महत्वाची भूमिका बजावतं. मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण 50-60 टक्के असतं.
2 / 9
पाणी हे कोशिकांच्या माध्यामातून पोषक तत्व आणि ऑक्सीजन पोहोचवतं. यासोबतच पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास त्याचेही अनेक फायदे होते.
3 / 9
जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची अत्याधिक गरज असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला हवं.
4 / 9
सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. यामुळे रक्त स्वच्छ होतं. रक्त स्वच्छ झाल्याने त्वचेवर चमक येते.
5 / 9
शरीराची स्वत:ची एक सुरक्षा यंत्रणा असते जी इन्फेक्शन आणि खराब कोशिकांशी लढण्यात मदत करतात. सकाळी पाणी प्यायल्याने इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता वाढते.
6 / 9
जपानी मेडिकल सोसायटीनुसार, रिकाम्या पोटी सकाळी पाणी प्यायल्याने तुम्हाला डोके दुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, वाढतं वजन, अस्थमा, टीबी, किडनी आणि लघवीच्या आजारांचा उपचार होण्यास मदत मिळते.
7 / 9
सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म सक्रिय होतो. त्यामुळे वजन कमी करण्यातही तुम्हाला मदत मिळते.
8 / 9
सकाळी उठून पाणी प्यायल्याने नवीन कोशिकांची निर्मिती होते. यासोबतच मांसपेशींमध्ये मजबूती येते.
9 / 9
सकाळी उठून पाणी प्यायल्याने गळा, मासिक पाळी, डोळे, लघवी आणि किडनीसंबंधी समस्या दूर होतात.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य