शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पर्यटकांची होणार परवड, गोव्यात टुरिस्ट टॅक्सी उद्याही बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 8:22 PM

1 / 6
गोव्यात टुरिस्ट टॅक्सीमालकांच्या मागण्यांवर तोडगा येऊ न शकल्याने उद्या शनिवारीही टॅक्सी बंद ठेवल्या जातील.
2 / 6
टुरिस्ट टॅक्सींच्या संपामुळे गोव्यात पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. बंद मोडून काढण्यासाठी सरकारने लागू केलेला ‘एस्मा’ धुडकावून टुरिस्ट टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, याकरिता कदंब महामंडळ तसेच जीटीडीसीने बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज केल्या आहेत. परंतु या बसगाड्या अपु-या पडत आहेत.
3 / 6
सुमारे 2 हजार टॅक्सीमालक येथील आझाद मैदानात जमा झाले असून आंदोलन करत आहेत. सर्व प्रमुख हॉटेलांच्या आवारात तसेच रेल्वे स्थानके, दाबोळी विमानतळ तसेच बसस्थानकांच्या आवारात असलेल्या टुरिस्ट टॅक्सी बंद आहेत. फक्त काळ्या पिवळ्या टॅक्सी तसेच सरकारी खात्यांसाठी कंत्राटावर चालणा-या अवघ्याच टुरिस्ट टॅक्सी चालू आहेत.
4 / 6
अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
5 / 6
सरकारी खात्यांसाठी कंत्राटावर चालणा-या अवघ्या काही निवडक वगळता सुमारे ९५ टक्के टॅक्सी आज बंद राहिल्या.
6 / 6
टुरिस्ट टॅक्सींचा संप चिरडण्यासाठी सरकार जर ‘ओला’ किंवा ‘उबेर’ची सेवा गोव्यात सुरु करण्याचा विचार करीत असेल तर आम्ही चाळीसही आमदारांविरुध्द काम करु आणि त्यांच्याविरुध्द आघाडी उघडू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
टॅग्स :goaगोवाStrikeसंप