1 / 9राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थिती दर्शवली. 2 / 9गडचिरोलीत 'शासन आपल्या दारी' या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 3 / 9यानिमित्तानं नागरिकांना संबोधित करताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. सरकार हे जनतेसाठी असतं, हेही सांगितलं. 4 / 9सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, त्यांचे हेलपाटे कमी व्हावेत आणि लाभ हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महायुती सरकारचं आजचं हे कार्यक्रम आहे. 5 / 9उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शासनाचा पहिला महत्त्वाचा कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात पार पडतोय. यावेळी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो. 6 / 9देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आगेकूच करतोय. गेली ९ वर्षे देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता मोदी साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी काम करत आहेत. 7 / 9अशावेळेस केंद्र सरकार व राज्य सरकार एकाच विचाराचं असलं तर केंद्रासह राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणं सुकर होतं. त्यामुळेच आज अनेक उद्धाटनं पार पडली, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.8 / 9ही उद्धाटनं पार पडत असताना मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शासकीय वसतिगृह आणि शासकीय निवासी वसतिगृह, निवासी शाळा इमारतीचं बांधकाम २५ कोटी रुपये खर्चून उभं करण्यात आलं. 9 / 9मुरमगाव येथे अडीच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राचं ऑनलाइनच्या माध्यमातून उद्धाटन झालं. त्याचबरोबर, येथील विकास कामांचा पाढाच अजित पवार यांनी वाचून दाखवला.