शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली आलिशान कार; गिफ्टने तोही अवाक्, किंमत पाहून डोळे विस्फारतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 4:38 PM

1 / 8
पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डोचे फिफा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. अलीकडेच त्यांचा संघ विश्वचषक स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला होता. रोनाल्डो ५ फेब्रुवारीला ३८ वर्षांचा होईल. अशा परिस्थितीत पुढील विश्वचषक खेळणे त्याच्यासाठी खूप कठीण आहे.
2 / 8
विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर रोनाल्डोचे रडणारा फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र आता सर्व दु:ख विसरून रोनाल्डो कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करताना दिसला. दरम्यान, त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रोड्रिग्जने ख्रिसमसच्या निमित्ताने रोनाल्डोला एक सरप्राइज गिफ्ट दिलं.
3 / 8
जॉर्जिनाने रोनाल्डोला एक आलिशान कार असणारी रोल्स रॉयस डॉन भेट दिली. या कारची बाजारातील किंमत ३,०००,०००पौंड म्हणजेच सुमारे ३ कोटी रुपये आहे.
4 / 8
जॉर्जिना सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. जॉर्जिनाने या भेटवस्तूचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
5 / 8
व्हिडीओमध्ये रोनाल्डो मुलांसोबत घराच्या बाहेर जाताना दिसतो. तेव्हा बाहेर आल्यावर अचानक समोर एक कार दिसते आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज ही रोनाल्डोला सरप्राइज गिफ्टबद्दल सांगते.
6 / 8
जॉर्जिना आणि रोनाल्डो २०१६ पासून एकत्र आहेत. या ख्रिसमसच्या निमित्ताने जॉर्जिनाने मेणबत्त्या पेटवून तिचे संपूर्ण घर भव्य पद्धतीने सजवले. रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसणारी जॉर्जिना एक उत्तम बेली डान्सरही राहिली आहे.
7 / 8
अलीकडेच, कतारमध्ये फिफा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघ चॅम्पियन बनला. या विश्वचषकादरम्यानही जॉर्जिना आपल्या मुलांसह कतारला पोहोचली होती. तिथे तिने पती आणि पोर्तुगाल संघाला पाठिंबा दिला होता.
8 / 8
यंदाचा कतार फिफा विश्वचषक क्रिस्टियानो रोनाल्डोसाठी अजिबात चांगला नव्हता. नुकताच त्याने इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड सोडला आहे. आता अशा बातम्या येत आहेत की, रोनाल्डो लवकरच सौदी अरेबियातील एका क्लबसोबत करार करू शकतो.
टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोSocial Viralसोशल व्हायरल