चेह-याला मेकअप तर नव्हताच, मास्कचाही हिनाला पडला विसर, फोटो पाहून मिळातायेत अशा कमेंट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 18:53 IST2021-03-31T18:45:32+5:302021-03-31T18:53:14+5:30
Hina Khan Raoming Without Mask :'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अक्षराच्या रुपात घराघरांत पोहोचलेली हिना आता स्टायलिश आणि अधिकच बोल्ड झाली आहे. हिना खानला आजही तिचे चाहते अक्षरा बहु याच नावाने जास्त ओळखतात.

साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने ये रिश्ता....मालिका सोडत आव्हानात्मक कामे स्विकारली.
मालिकेनंतर ती रिअॅलिटी शोमध्ये झळकली. 'बिग बॉस 11' आणि 'खतरों के खिलाडी सिझन 8' मध्येही सहभागी झाली होती.
त्यानंतर 'कसौटी जिंदगी की' मालिकेत कोमोलिका भूमिकेतही ती झळकली होती.
'आजवर लोकांनी तिला संस्कारी सून, मुलीच्या भूमिकेत बघितले.
हिना कितीही केले तरी तिची इमेज बदलण्यात अयशस्वीच ठरत आहे.
त्यामुळे बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
यावेळी हिनाने एक चूक केली, कोरोनाचे संकट संपलेले नाही याचा विसरच तिला पडल्याचे दिसले.
विना मास्कच ती बिनधास्त फिरताना दिसते. मास्कचा वापर करणे बंधनकारक असले तरीही कलाकार मंडळीच नियम धाब्यावर बवत असल्याचे चित्र आहे.
नेहमीप्रमाणे मीडियाचे कॅमेरे दिसतातच पोजवर पोज तिने दिल्या.