नवरात्रीसाठी ट्राय करू शकता डिझायनर अनीता डोंगरेचे 'हे' क्लासी आउटफिट्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:02 IST2018-10-09T16:55:56+5:302018-10-09T17:02:50+5:30

सध्या नवरात्रीचे दिवस सुरू असून त्यानिमित्ताने तुम्हीही आपला लूक हटके करण्यासाठी शॉपिंग करण्याचा विचार करत आहात? तुमचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.

सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये हॉलिवूडची क्रेझ वाढताना दिसून येत आहे. त्याचबरोबर अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी आपल्या फॅशनेबल आउटफिट्ससाठीही अनेक परदेशी फॅशन डिझायनर्सचे ब्रँड आणि आउटफिट्सना पसंती देताना दिसत आहेत. दीपिका, प्रियांका सारख्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींचादेखील यांमध्ये समावेश आहे. परंतु ज्यावेळी इंडियन आउटफिट्सचा प्रश्न येतो त्यावेळी याच अभिनेत्री आवर्जुन इंडियन डिझायनर्सचीच निवड करताना दिसून येतात.

मनीष मल्होत्रा, अबू जानी, अनीता डोंगरे यांसारखे अनेक मोठे डिझायनर्स असे आउटफिट्स तयार करत आहेत जे या बॉलिवूड तारकांच्या सौंदर्यात आणखी भर घालतील. आज जाणून घेऊयात डिझायनर अनीता डोंगरेच्या खास ऑउटफिट्सच्या कलेक्शनबाबत जे लग्न समारंभापासून इतर सर्व समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता.