1 / 7मुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण देणे ही प्रत्येक भारतीय कुटुंबाची गरज असते. यासाठी माध्यमिक शिक्षणानंतर परदेशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे आणि संस्था यांचा पर्याय शोधला जातो. परदेशातील शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी जमवण्याची गरज असते. हा निधी कसा जमवावा, जाणून घेऊ...2 / 7मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कोठे गुंतवायचे हे जाणून घेण्यापूर्वी, तुम्हाला नेमकी किती रक्कम जमवायची आहे हेही लक्षात ठेवावे लागेल. तुमचा मुलगा कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेईल हे १० ते १५ वर्षे अगोदर स्पष्ट नसते. 3 / 7तसेच, महाविद्यालयांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क घेतले जाते. याचा आणि तेथे राहण्याचा खर्च याची गोळाबेरीज करून नेमकी किती रक्कम गुंतवावी लागेल याची आकडेमोड करा.4 / 7गुंतवणूक करतानाच १० वर्षांनंतर महागाई आणि रुपयाची पत किती असेल याचा विचार करा. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये चार वर्षांच्या अंडरग्रॅज्युएट कोर्सची किंमत आज सुमारे २ लाख डॉलर (१.५६ कोटी रुपये) आहे. मात्र जर १५ वर्षांनंतर तुमचा मुलगा तिथे शिक्षणासाठी गेला तर त्यासाठी ४.३ कोटी रुपये खर्च येईल.5 / 7शेअर बाजारात एकाच वेळी पैसे न टाकता एसआयपी पद्धतीने गुंतवणूक वाढवत चला. यातून दीर्घकाळानंतर मोठी रक्कम उपलब्ध होईल. याच वेळी तुम्ही चलनातील धोका कमी करण्यासाठी नॅस्डॅक १००, एसअँडपी ५०० या विदेशी निर्देशांकांमध्ये गुंतवणूक सुरू करा. 6 / 7जगभरातील शेअर बाजारांमध्ये अस्थिरता असली तरीही दीर्घकालीन दृष्टीने पाहिले असता गेल्या १५ वर्षांत निफ्टी ५० ने १४.४६ टक्के तर नॅस्डॅक १०० ने २०.९३% परतावा दिला आहे.7 / 7जर तुमचे ध्येय ठरले असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल, तर तुमची सुरुवात चांगली होईल. जितका वेळ हातात असेल तितकी कमी रक्कम तुम्हाला दरमहा गुंतवावी लागेल. तत्काळ गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.