शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जेव्हा पडद्यावरील लक्ष्मणाला करावा लागला चोरांचा सामना; हनुमानाने केली 'अशी' मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 11:02 PM

1 / 6
अशा परिस्थितीत लोकांच्या करमणुकीसाठी 80 आणि 90 च्या दशकातील अनेक मालिका टीव्हीवर परत पाहता आल्या आणि रामायण लोकांना खूप आवडले.
2 / 6
दरम्यान, रामानंद सागर यांच्या रामायणातील लक्ष्मण म्हणजेच अभिनेता सुनील लहरी यांनीही रामायणाशी संबंधित कथा त्याच्या चाहत्यांसह शेअर करण्यास सुरवात केली आणि ते अजूनही सुरु आहे. या प्रकरणात सुनील लहरी यांना अजून एक किस्सा आठवला. तो त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
3 / 6
यात सुनील लहरी यांनी  अभिनेता दारा सिंगशी संबंधित एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. ज्यात त्यांनी रामायण मालिकेमुळे त्यांनी केलेल्या पहिल्या परदेश दौर्‍याचा उल्लेख केला आहे. यामध्ये सुनील असे म्हणतात की, 'रामायणाच्या संदर्भात आम्ही प्रथमच देशाबाहेर परदेशवारीला म्हणजेच केनियाला गेलो होतो. ती खूप सुंदर जागा होती. तिथे संपूर्ण टीमने खूप मजा केली.
4 / 6
मी आणि दारा सिंह जी केनियामध्ये एकत्र खरेदीसाठी गेलो होतो. तिथे खरेदी करताना दारासिंह जी यांनी मला एक ब्रीफकेस दिला. आम्ही खरेदीनंतर बाहेर गेलो.
5 / 6
'दारासिंह जी यांचे व्यक्तिमत्त्व खूप चांगले होते. ते माझ्या पुढे चालू लागले आणि मी जरा मागे होतो. तेवढ्यात, एक माणूस मागून आला आणि माझ्या ब्रीफकेस घेऊन पळाला. मी चोर...चोर... म्हणून ओरडायला सुरुवात केली.
6 / 6
जेव्हा चोर दाराजींकडून जात होता, तेव्हा दारा सिंग यांनी चोराचा  हात धरला आणि तो हवेत उडविला. हे पाहून चोर इतका घाबरला की, तो ब्रीफकेस तिथेच सोडून पळून गेला. ही ब्रीफकेस माझ्यासाठी खूप खास होती. कारण ती ब्रीफकेस दारा यांनी भेट म्हणून दिली होती. ती ब्रीफकेस मी आतापर्यंत जपून ठेवली आहे.
टॅग्स :ramayanरामायणRobberyचोरी