शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कॉलेज तरुणीला बाईकवर स्टंट करणे पडले भारी; Video व्हायरल होताच पडल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 1:12 PM

1 / 10
सूरतच्या रस्त्यांवर भरदिवसा आणि रात्री बिनदिक्कतपणे बाईकवर स्टंटबाजी करणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. व्हिडीओ व्हाय़रल होताच पोलिसांनी सूरतच्या डुम्मस भागात स्टंट करणाऱ्या या तरुणीला अटक केली आहे.
2 / 10
ही तरुणी सुरतच्या रस्त्यांवर हात सोडून बाईक चालवत स्टंट करत तिच्यासह लोकांचा जीव धोक्यात घालत होती.
3 / 10
महत्वाचे म्हणजे ही तरुणी बारडोलीवरून सूरतला फक्त स्टंट करण्यासाठी आणि व्हिडीओ बनविण्यासाठी येत होती.
4 / 10
हे काढलेले व्हिडीओ ती तिच्या सोशल मीडियावर अपलोड करत होती. यावेळी ती हेल्मेट गार्ड वापरू नका असा संदेश देत नसल्याचे त्या खाली नमूद करत होती.
5 / 10
सूरत पोलिसांनी या तरुणीला डुम्मस भागात स्टंट करण्याचा आरोपाखाली अटक केली आहे. शिवाय कोरोना गाईडलाईनुसार मास्क न वापरणे यावरही कारवाई करण्यात आली आहे.
6 / 10
तरुणीचा व्हिडीओ व्हाय़रल झाल्यानंतर जेव्हा पोलिसांनी याचा तपास केली तेव्हा बाईकचे रजिस्ट्रेशन बिलाल घांची या व्यक्तीच्या नावे आढळले.
7 / 10
त्याला पकडल्यानंतर त्याने ही बाईक फोटोग्राफीसाठी संजना उर्फ पिन्सी प्रसाद या तरुणीला दिल्याचे सांगितले.
8 / 10
पोलिसांनी या तरुणीला शोधून काढले, तेव्हा ती बारडोलीची असल्याचे समोर आले. ही तरुणी बाईक चालविण्यासाठी सुरतला येत होती.
9 / 10
संजना ही कॉलेज विद्यार्थीनी असून दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 3.27 लाख फॉलोअर्स आहेत.
10 / 10
धक्कादायक बाब म्हणजे तिने आतापर्यंत 80 हून अधिक बाईक स्टंटचे व्हिडीओ बनविले असून ते सारे इन्स्टावर पोस्ट केले आहेत.
टॅग्स :Policeपोलिसbikeबाईक