लॉकडाऊनमध्ये सूत जुळले; ऑगस्टमध्ये घेतले सात फेरे अन् ऑक्टोबरमध्ये पत्नीचा गळा घोटला
By पूनम अपराज | Updated: October 30, 2020 17:52 IST
1 / 6लॉकडाऊनमध्ये तरुण-तरुणी एकमेकांचे प्रेमात पडले. त्यानंतर ऑगस्टमध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले. यानंतर ऑक्टोबर महिन्यात या दोघांमधील वाद इतका वाढला की, मंगळवारी रात्री पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. यानंतर पतीने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. त्याने आपला गुन्हा कबूल केला.2 / 6ही घटना इंदूरमधील संयोगितागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे कुटुंबातील वादातून नवविवाहित दाम्पत्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.3 / 6पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पतीने कुत्र्याच्या साखळीने पत्नीची गळा दाबला, नंतर चाकूने सपासप वार करून पत्नीची हत्या हत्या केली. पत्नी २२ वर्षीय होती. 4 / 6मृत पत्नीचे नाव अंशू असून तिचे कुटुंबीय तिचा पती व त्याच्या कुटुंबीयांवर आरोप लावत आहेत. याशिवाय पोलीस सासरच्या दबावामुळे कारवाई करीत नसल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केला आहे.5 / 6कांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लगीनगाठ बांधली. अंशूच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. तर हर्षचे वडील राजीव हे स्टॉक ब्रोकर असून त्यांचं पालसिया येथे कार्यालय आहे. 6 / 6आरोपी हर्ष शर्मा हा माजी विधानसभा अध्यक्ष यांचा नातू असल्याची माहिती पत्रिका या न्यूज पोर्टलने व्हिडिओद्वारे दिली आहे.