Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:36 IST
1 / 10मेघालयातील हनिमूनला नेऊन करण्यात आलेल्या हत्येचा प्रकरणात सोनम रघुवंशी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सोनम रघुवंशीनेच प्रियकराच्या मदतीने केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. 2 / 10सोनम रघुवंशीचे या प्रकरणापासून काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटोही समोर आलेत.3 / 10सोनम रघुवंशीचे कॉर्पोरेट ते पारंपरिक लुकमधील फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.4 / 10राजा रघुवंशीसोबत सोनमचे लग्न झाले होते. मात्र, त्यापूर्वीच सोनमचे राज कुशवाहसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती या हत्येनंतर समोर आली.5 / 10सोनम रघुवंशी लग्नासाठी लागणाऱ्या कपड्यांची खरेदी करतानाचेही काही फोटो आहेत. शॉपिंगवेळी सोनम काही फोटो काढले आहेत.6 / 10११ फेब्रुवारी रोजी सोनम आणि राजा रघुवंशीचा साखरपुडा झाला होता. त्याचेही फोटोही आहेत. सोनमचा राजासोबत लग्न करण्यास नकार होता, तरीही तिचे लग्न लावून देण्यात आले.7 / 10सोनम लग्नापूर्वीच्या काही फोटोंमध्ये खूप ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. काही फोटो कॉर्पोरेट लूकमधीलही आहेत. 8 / 10सोनम रघुवंशी घरच्याच प्लायवूड व्यवसायामध्ये मॅनेजरच्या भूमिकेत सगळे काम बघायची. त्यावेळचा तिचा प्रोफेशनल लूकमधील काही फोटोही आहेत.9 / 10२३ जून रोजी राजा आणि सोनम बेपत्ता झाले होते. त्यांची स्कूटर बेवारस स्थितीत आढळली होती. नंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला होता.10 / 10राजाची हत्या करून सोनम फरार झाली होती. त्यानंतर ती इंदूरमध्ये येऊन राहिली. पोलिसांनी मदत करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये गेली आणि अपहरण झाले होते, असा बनाव केला.